राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाही - सूत्रांची माहिती

मुंबई
Updated Apr 20, 2019 | 21:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

यंदाच्या निवडणुकीत मनसेकडून एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला नाही. मात्र त्यानंतरही राज्यभरात राज ठाकरे यांच्या सभा होत आहेत. राज ठाकरे यांच्या सभेत भाजप सरकार तसेच मोदींच्या विविध योजनांची पोलखोल होत

mns raj thackeray
मनसे राज ठाकरे  |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भाजप सरकारविरोधात जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला गुढीपाडव्यानंतर सुरूवात झाली होती. यंदाच्या निवडणुकीत मनसेकडून एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला नाही. मात्र त्यानंतरही राज्यभरात राज ठाकरे यांच्या सभा होत आहेत. राज ठाकरे यांच्या सभेत भाजप सरकार तसेच मोदींच्या विविध योजनांची पोलखोल होत आहे. 

दरम्यान २४ एप्रिलला मुंबईत होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचे भवितव्य मात्र अद्याप अंधारातच आहे. या सभेसाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकारची पोलखोल करणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेत आडकाठी आणण्याच प्रयत्न केला जात आहे की काय असे दिसत आहे.

राज ठाकरे यांनी अधिकृतपणे जरी काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचे म्हटले नसले तरी भाजपविरोधातील राज ठाकरेंचा प्रचार हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी नक्कीच लाभदायक ठरू शकतो. राज ठाकरेंनी नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि रायगड येथे प्रचारसभा घेतल्या. राज ठाकरे यांच्या या सर्व प्रचारसभा गाजत आहे. 

प्रत्येक सभेमध्ये राज ठाकरे मोदींनी गेल्या निवडणुकीत दिलेली आश्वासने आणि त्यांची पोलखोल करत आहेत. त्यांच्या या सभांना लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या संख्येने लोक राज ठाकरेंच्या सभेला हजेरी लावत आहे. पंतप्रधान मोदी हे विकासकामांबद्दल न बोलता केवळ विरोधकांवर टीकाच करत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याचे आवाहन राज ठाकरे या सभेमधून करत आहे. 

लाव रे तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

राज ठाकरे यांच्या प्रत्येक भाषणात मोदींची आणि सरकारची पोलखोल करण्यासाठी त्यांचेच जुने व्हिडिओज दाखवले जातात. यावेळी राज ठाकरे व्हिडिओ चालवणाऱ्यांना लाव रे तो व्हिडिओ असे सांगतात. दरम्यान, हे वाक्य सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे. या विधानाला सत्ताधारी भाजप कसे घाबरत आहेत याचे मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाही - सूत्रांची माहिती Description: यंदाच्या निवडणुकीत मनसेकडून एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला नाही. मात्र त्यानंतरही राज्यभरात राज ठाकरे यांच्या सभा होत आहेत. राज ठाकरे यांच्या सभेत भाजप सरकार तसेच मोदींच्या विविध योजनांची पोलखोल होत
Loading...
Loading...
Loading...