MNS Sandeep Deshpande slams CM Uddhav Thackeray Speech : मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत विरोधकांवर टीका केली. औरंगाबाद येथील शिवसेनेच्या पहिल्या शाखेच्या ३७व्या वर्धापनदिनाचे निमित्त साधून घेतलेल्या स्वाभिमान सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. पण ते भाषण म्हणजे लवंगीच्या फुसक्या माळा, अशा शब्दात मनसेच्या संदीप देशपांडेंनी टीका केली.
औरंगाबादमधील सभेत स्थानिक प्रश्नांवर मुख्यमंत्री बोलले नसल्याची टीका मनसेच्या संदीप देशपांडेंनी केली. 'ना पाणी प्रश्नावर ठोस भूमिका, ना हिंदुत्वावर, ना शहराच्या नामांतरणावर, ना हुंकार फक्त लावंगीच्या फुसक्या माळा' असे मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले.
औरंगाबाद जिल्ह्याचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी भाजपने जलआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चावर बोलताना पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल आणि कंत्राटदार काम करत नसेल तर हातात दंडुका घ्या, अशा सूचना विभागीय आयुक्तांना दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. रस्ते, सफारी पार्क, पर्यटन विकास अशा वेगवेगळ्या विकासकामांवर सरकार लक्ष देत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यांवर मनसेच्या संदीप देशपांडेंनी टीका केली. पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही, अशा स्वरुपाची नाराजी मनसेच्या संदीप देशपांडेंनी व्यक्त केली.
औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर करणार असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. आता राज्याचे मुख्यमंत्रीपद असूनही शिवसेनेने हे नामांतर केलेले नाही. हा मुद्दा मांडत संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत टीका केली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.