MNS Sandeep Deshpande Slams Shivsena : मुंबई : शिवसेना ही महाविकास आघाडीतील "ढ"टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि "ढ" टीम चे कप्तान तोंडावर आपटले, असे मनसेच्या संदीप देशपांडे यांनी ट्वीट केले.
Uddhav Thackeray । तुझसे नाराज नहीं हू मै.... म्हणतायत उद्धव ठाकरे
पुन्हा शिवसेनेच्या एका आमदाराचे खळबळजनक वक्तव्य, सत्ता बदलाचे स्पष्ट दिले संकेत
महाराष्ट्रात शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद असूनही पक्ष म्हणून सेनेला राज्याच्या राजकारणात जास्त महत्त्व नाही. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींना विकासनिधी जास्त प्रमाणात मिळत आहे. ही तक्रार काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्याच लोकप्रतिनिधींनी केली होती. काही निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. आता राज्यसभेसाठी महाराष्ट्रात सहा जागांकरिता मतदान झाले. या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन पैकी एका उमेदवाराचा पराभव झाला आणि इतर पक्षांचे निवडणूक लढविणारे सर्व उमेदवार विजयी झाले. मुख्यमंत्री पद हाती असूनही राज्याच्या राजकारणात शिवसेनेच्या पदरीच वारंवार अपयश येत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला उद्देशून ट्वीट केले.
याआधी राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विजय झाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि अनिल बोंडे या दोघांना प्रत्येकी ४८ तर धनंजय महाडिक यांना ४१ मते मिळाली. काँग्रेसच्या इमरान प्रतापगढी यांना ४४ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांना ४३ मते मिळाली. शिवसेनेच्या संजय राऊत यांना ४१ मते मिळाली. सेनेचे संजय पवार फक्त ३३ मते मिळवू शकले. संजय पवार यांचा निवडणुकीत पराभव झाला. राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एक मत बाद ठरविण्यात आले. हे बाद झालेले मत पण शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे होते. एकूण राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेलाच फटका बसल्याचे चित्र आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला उद्देशून ट्वीट केले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.