मोदी सरकारमुळे शोषित, वंचितांना मिळाले संरक्षण : भांडारी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 02, 2022 | 20:01 IST

Modi government work for social welfare : मुंबई : कोरोना संकटाच्या काळात मोदी सरकारच्या गरीब कल्याण कार्यक्रमामुळे शोषित आणि वंचित असलेल्यांना संरक्षण मिळाले, असे भाजपचे माधव भांडारी म्हणाले.

Modi government work for social welfare
मोदी सरकारमुळे शोषित, वंचितांना मिळाले संरक्षण : भांडारी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मोदी सरकारमुळे शोषित, वंचितांना मिळाले संरक्षण : भांडारी
  • मोदी सरकारने गोरगरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या
  • अनेक वर्षांपासूनचे प्रश्न मोदी सरकारने निकालात काढले

Modi government work for social welfare : मुंबई : कोरोना संकटाच्या काळात मोदी सरकारच्या गरीब कल्याण कार्यक्रमामुळे शोषित आणि वंचित असलेल्यांना संरक्षण मिळाले, असे भाजपचे माधव भांडारी म्हणाले. मोदी सरकारने कोरोना काळात ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य वाटप केले. देशातील नऊ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिली. भारतातील तीन कोटींपेक्षा जास्त नागरिकांना सरकारी योजनेतून त्यांच्या मालकीचे घर दिले. मोदी सरकारने ४१ कोटींपेक्षा जास्त जनधन खात्यांमध्ये सरकारच्या कल्याणकारी योजनेतून निधी वाटप केले; असेही माधव भांडारी म्हणाले.

मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या ‘सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची आठ वर्षे’ या विषयावर बोलताना माधव भांडारी सविस्तर आकडेवारी जाहीर केली. सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास आणि सब का प्रयास हा मंत्र घेऊन मोदी सरकारने गोरगरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या. भारताची जगात बलशाली देश अशी प्रतिमा निर्माण केली. 

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटविणे आणि राम मंदिराच्या उभारणीतले अडथळे दूर करणे ही दोन मोठी कामं मोदी सरकारने केली. तिहेरी तलाक पद्धत रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर करणे या सारख्या निर्णयांमुळे अनेक वर्षांपासूनचे प्रश्न मोदी सरकारने निकालात काढले. कायम अशांत असणा-या ईशान्य भारताला हिंसाचार मुक्त केले. अंतर्गत सुरक्षा बळकट केल्यामुळे गेल्या आठ वर्षात काही अपवाद वगळता  दहशतवाद्यांचा एकही मोठा  हल्ला झाला नाही. सीमेवर झालेल्या आगळीकीला त्याच भाषेत उत्तर दिले गेल्यामुळे भारताकडे कणखर राष्ट्र म्हणून पाहिले जाऊ लागले आहे, असे माधव भांडारी म्हणाले. ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणे, वन रँक वन पेंशन सारखे निर्णय अंमलात आणणे, जातीय आरक्षण नसलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना आरक्षण देणे या निर्णयातून मोदी सरकारने समाजातील सर्व घटकांना विकासाच्या प्रवाहात आणले आहे; असे माधव भांडारी यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी