Uddhav Thackeray on Amit Shah: मुंबईः शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी उत्तर भारतीयांबरोबर ( North Indians) संवाद साधताना शिंदे गटावर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)यांच्यावर हल्लाबोल केला. काल पुण्यात कोणी आलं होतं (अमित शाह), त्यांनी विचारलं महाराष्ट्रात कसं काय सुरू आहे. त्यानंतर ते म्हणाले आज खूपच चांगला दिवस आहे. कारण शिवसेनेचे नाव आणि चिन्ह आपल्यासोबत जे गुलाम आले आहेत, त्यांना दिलं. तर ते (अमित शाह) म्हणाले खूपच छान, मोगॅम्बो खुश हुआ,'' अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी नाव न घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांच्यावर केली आहे. ( 'Mogambo Khush Hua' after Shiv Sena's name and symbol went away - Uddhav Thackeray)
अधिक वाचा : MHADA घरांच्या लॉटरीतील वास्तव्याची अट रद्द करा- BJP
उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आले होते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी उत्तर भारतीयांबरोबर संवाद साधला गेल्याने भविष्यात ठाकरे गटाला याचा काय फायदा होणार ते येणाऱ्या दिवसातच स्पष्ट होणार आहे. परंतु यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर तोफ डागली. मी भाजपला सोडल आहे, हिंदुत्वाला सोडलं नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि विरोधकाना सुनावलं. अमित शाह यांना लक्ष्य करत उद्धव ठाकरे म्हणाले की, ''हे मोगॅम्बो आहेत.
अधिक वाचा : उद्या आहे वर्षाची पहिली सोमवती अमावस्या, जाणून घ्या महत्व
तुम्ही मिस्टर इंडिया चित्रपट आठवला तर त्यातील मोगॅम्बोला हेच हवे होते. देशात आपापसात लढाई व्हावी. लोक आपसात लढत राहिले, तर मी राज्य करेन. आजचे मोगॅम्बो हेच तर आहेत. हिंदू असाल तरी लढा, आमच्यासोबत जे आहेत, तेच आमचे. हिंदू असो की कोणी दुसरा, त्याने फरक पडत नाही. तुम्ही आमच्या पक्षात आले तर, तरच तुम्ही हिंदू. नाही तर तुम्ही हिंदुत्व सोडलं.'' ते म्हणले, ''अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो, कुठं माझं चुकलं. मी कधी आपसात भांडण लावली? कधी शिवसेनेनं आपसात लढाई लावली आहे, कधीच नाही.''
शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाकडे गेला असला तरी तुम्ही तुमचे चिन्हे घ्या आणि मर्द असाल आणि तुमच्यात हिम्मत असेल तर मैदानात या अशा शब्दात त्यांनी शिंदे गटाबरोबर शड्डू ठोकला आहे. ज्या पद्धतीने शिंदे गट आणि भाजप ठाकरे गटावर टीका करत आहे. निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून निवडणूक लढवली असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र भाजपने काय केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी महाराष्ट्रात येतात त्यावेळी त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याच फोटोचा वापर करावा लागतो. त्यावेळी यांचे राजकारण कुठे जाते असा सवालही त्यांनी यावेळी केला.
अधिक वाचा : Horoscope: कोणत्या राशींसाठी सोमवती अमावस्येचा दिवस आहे खास
महाविकास आघाडीबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मी काँग्रेससोबत गेलो नाही, तर भाजपने मला ढकललं आहे. मला हे यासाठी सांगायचं आहे की, तुमच्या मनात कोणताही गैरसमज राहू नये. 2014 मध्ये मी युती तोडली नव्हती. भाजपने युती तोडली होती. तेव्हाही मी हिंदू होतो, आजही मी हिंदू आहे. त्यावेळी तुम्ही युती तोडली, नंतर शेवटी त्यांना आमची गरज लागली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.