'मोहित कंबोजांचा स्ट्राईक रेट १०० टक्के', राष्ट्रवादीचा कोणता बडा नेता अडकणार?; शेलारांच्या प्रतिक्रियेनंतर उलटसुलट चर्चा

मुंबई
रोहित गोळे
Updated Aug 17, 2022 | 13:15 IST

Ashish Shelar: राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचं ट्विट भाजप नेता मोहित कंबोजने केला आहे. ज्याबाबत आशिष शेलारांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

mohit kamboj strike rate is 100 percent ashish shelar reaction which ncp leader will go to jail
'मोहित कंबोजांचा स्ट्राईक रेट १०० टक्के', राष्ट्रवादीचा कोणता बडा नेता अडकणार?; 
थोडं पण कामाचं
  • मोहित कंबोज यांचं खळबळजनक ट्वीट
  • मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचं केलं ट्वीट
  • मोहित कंबोज यांच्या ट्विटबाबत आशिष शेलारांची प्रतिक्रिया

Mohit Kamboj: मुंबई: राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होताच नवनव्या मुद्द्यांवरुन टीका-टिप्पणी सुरु झाली आहे. त्यात भाजपचे (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी काल एक ट्विट केलं होतं. ज्यामुळे राजकिय वर्तुळातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याचबाबत भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट हा १०० टक्के आहे. ते माहितीच्या आधारावरच आरोप करतात. 

दरम्यान, आशिष शेलार यांच्या प्रतिक्रियेनंतर मोहित कंबोज आता नेमकं कोणावर आरोप करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. 

पाहा आशिष शेलार नेमकं काय म्हणाले. 

'मोहित कंबोजांचा स्ट्राईक रेट १०० टक्के आहे'

'कोणाबद्दल तारखा सांगणं आणि अशा पद्धतीने बोलणं यामधून गैरअर्थ निघू शकतात. प्रत्येकाला आपल्याकडची माहिती जगासमोर आणण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मोहित कंबोज ते करतील. याबद्दलची स्पष्टता देऊ शकतं. मी काही सरकारचा भाग नाहीए. सरकारमध्ये बसलेले मंत्री याबद्दलची माहिती देतील.'

अधिक वाचा: हे नेते झोपत का नाहीत?

'मोहित कंबोज यांचं ट्विट हे त्यांचं मत आहे. पण त्यांचा स्ट्राईक रेट १०० टक्के आहे एवढं नक्की. योग्य माहिती असल्याशिवाय ते बोलत नाहीत. संपूर्ण माहितीच्या आधारावरच त्यांनी आतापर्यंत भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडले आहेत. यासाठीच त्यांचं ट्विट हे फार गूढ आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे की, कोणी कोणाला जेलमध्ये टाकणं, त्याची तारीख सांगणं. याबाबत वक्तव्य करण्यापासून वाचलं पाहिजे. पण मोहित कंबोजांकडे जी माहिती असेल ते ती जाहीर करतील आणि त्याबाबत स्पष्टीकरणही देतील.' असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. 

आदित्य ठाकरेंवरही टीका 

'आदित्यजी मतं घ्यायची मोदीजींचा फोटो लावून आणि मांडीत जाऊन बसायचं सोनिया गांधींच्या. ही शिवसेनेची बेईमानी नाही का? लाचारी या शब्दाचा अर्थ घ्यायचा असेल तर मदत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घ्यायची आणि सत्तेची गोड फळं चाखण्यासाठी शरद पवारांच्या मांडीत जाऊन बसायचं. याला लाचारी म्हणत नाही का? त्यामुळे आदित्यजी जरा अभ्यास करा. अभ्यास करायला तुम्हाला वय आहे.' अशी घणाघाती टीका आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

अधिक वाचा: "राष्ट्रवादीतला एक मोठा नेता लवकरच देशमुख, मलिकांना भेटणार"

'मुळातच गड कोणाचा हे कोणी ठरवलं? गडावर ठरणं आणि ठरवणं हे शेलार मामांशिवाय कोण करु शकतो? त्यामुळे आम्ही गड वैगरे त्यांचा आम्ही मानत नाही. स्वत: आदित्य ठाकरे सुद्धा निवडून आले आहेत ते भाजपच्या मतांवर. युतीतून ते जिंकून आले आहेत. त्यामुळे मुंबईभर भाजप जवळ जवळ ३२७ दहीहंडीचे कार्यक्रम करते. यामध्ये २१७ च्या वर मंडळांना पक्षाकडून विमा कवच दिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईभर कार्यक्रम करतो आहोत. महानगर पालिकेच्या कामाला आधीच लागलो आहोत.' असंही आशिष शेलार यांनी यावेळी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी