मुंबई : राणा दाम्पत्यानं 'मातोश्री'वर येत हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर शेकडो शिवसैनिक (Shiv Sena Worker) मातोश्रीबाहेर (Matoshri) जमले आहेत. काल संध्याकाळी उशीरा मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांची गाडी मातोश्रीबाहेरुन जात होती. त्यावेळी शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्या गाडीवार हल्ला केल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे. हल्ला झाल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईतील (Mumbai) कलानगर जंक्शन (Kalanagar Junction) येथे त्यांच्या गाडीवर जमावाने हल्ला केला.
शिवसेना (Shiv Sena) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मला मारण्याचा आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. कलानगर जंक्शन येथे माझ्या गाडीवर जमावाने हल्ला केला पण ते कसेबसे पळून जाण्यात यशस्वी झाले. महाराष्ट्रातील कारभार पश्चिम बंगालपेक्षा वाईट आहे. नवाब मलिक यांच्यासारख्या भ्रष्ट मंत्र्यांचा पर्दाफाश करणाऱ्या विरोधकांवर राज्य सरकाकडून हल्लाबोल केला जात आहे. अशा कृत्यांचा निषेध करतो, असे कंबोज म्हणाले.
उत्तर भारतीय संघात एक विवाह सोहळा होता, तिथून निघून मी घरी परतत होतो, कला नगर जंक्शनजवळ सिग्लला गाडी जेव्हा थांबली, त्यावेळी शंभर दोनशे शिवसैनिकांचा जमाव गाडी जवळ आला. त्यांनी सरळ माझ्या गाडीवर हल्ला केला. मला काही कळण्याच्या आत तिथे पोलीस आले, पण शिवसैनिकांनी माझ्या गाडीच्या काचा फोडल्या, हँडल तोडलं, गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी गाडीत घुसण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलिसांनी तात्काळ तिथे धाव घेत जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सिग्नव सुटला आणि माझ्या ड्रायव्हरने तिथून गाडी बाहेर काढली. मुंबईत अशा प्रकारची घटना रस्त्यावर होत असेल, तर मला वाटतं मुंबईची कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेचा मी निषेध करतो, असं कंबोज यांनी म्हटलं आहे.
भाजप नेत्याच्या म्हणण्यानुसार ही घटना शुक्रवारी घडली. माझा आवाज दाबला जावा म्हणून शिवसेना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, मुंबई पोलीस काय कारवाई करतात ते बघू. सर्व काही सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाले आहे." कंबोज म्हणाले. याप्रकरणी भाजप नेत्याने मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की, भाजपचे मोहित कंबोज यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, त्यांच्या कारवर शिवसेना कार्यकर्त्यांच्या जमावाने हल्ला केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, कंबोजवर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात कोविड-19 नियमांच्या उल्लंघनासह शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर सार्वजनिकपणे तलवारी घेऊन उत्सव साजरा केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी भाजप नेत्याविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.
राणा दाम्पत्यानं 'मातोश्री'वर येत हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमले आहेत. अशात भाजप नेते मोहित कंबोज यांची कार मातोश्रीबाहेरुन जाताना दिसली. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या कारवर हल्ला केला होता. त्यावेळी कंबोजवर रेकी करण्याचा आरोप केला जात आहे, यावर त्यांनी आपली बाजू मांडली आहे. उत्तर भारतीय संघात एक विवाह सोहळा होता, तिथून निघून घरी परतत होते तेव्हा त्यांची कार कलानगर जंक्शनजवळसिग्लला थांबली, त्यावेळी शिवसैनिकांचा जमावांनी हल्ला केला.
लग्नावरुन जात असताना मंत्री अस्लम शेख, प्रसाद लाड, विखे पाटील हे माझ्याबरोबर हल्ल्याच्या दहा मिनिटापूर्वी होते, तिथून आम्ही एकत्र निघालो, काँग्रेस नेते भाई जगतापही तिथे होते. त्यामुळे रेकी करण्यासाठी गेल्याचा आरोप चुकीचा आहे. मी विवाह सोहळ्याला गेलो होतो तिथून निघून मी घरी जात होतो, तो एकच रस्ता आहे जिथून मी घरी जातो. माझ्याकडे हेलिकॉप्टर नाही की मी उडून घरी जाऊ.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.