Jitendra Awhad यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, काय झाली चर्चा?

मुंबई
सुनिल देसले
Updated Nov 15, 2022 | 14:51 IST

Sharad Pawar calls CM Eknath Shinde: जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. 

Molestation case registered against Jitendra Awhad after this Sharad Pawar calls CM Eknath Shinde read details in marathi
Jitendra Awhad यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, काय झाली चर्चा? 
थोडं पण कामाचं
  • जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
  • शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला - सूत्र
  • शरद पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर - सूत्र

Sharad Pawar calls CM Eknath Shinde: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यावर राजकीय क्षेत्रातून विविध प्रक्रिया येत आहेत. त्याच दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात थेट चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्री यांना कॉल केला आणि त्यानंतर दोघांमध्ये संभाषण झालं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर जो काही गुन्हा दाखल झाला आहे त्या संदर्भात फोनवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Molestation case registered against Jitendra Awhad after this Sharad Pawar calls CM Eknath Shinde read details in marathi)

एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, काल-परवामध्ये शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात फोनवर चर्चा झाली. यासोबतच जितेंद्र आव्हाड यांनी 'हर हर महादेव' सिनेमाला विरोध केल्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या संभाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, कोणत्याही राजकीय हेतूने किंवा आकसापोटी ही कारवाई करण्यात आलेली नाहीये. ही कारवाई दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार पोलिसांनी केली आहे.

हे पण वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती फोनवर कशा प्रकारे बोलते?

जे गुन्हे दाखल झाले आहेत त्या गुन्ह्याच्या अंतर्गत कारवाई झाली आहे. पोलिसांनी केलेली ही नेहमीची प्रक्रिया आहे. कोणत्याही प्रकारच्या राजकीय हेतूने आम्ही कारवाई केलेली नाहीये असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे. 

हे पण वाचा : योनी स्वच्छ ठेवण्यासाठी खास टिप्स

कोणत्याही राजकीय हेतूने अशा कारवाया करू नका. असे करणे उचित नाहीये तसे केल्याने एक वेगळा मेसेज लोकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे अशा कारवाया करणं टाळा असं शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या संभाषणात म्हटलं असल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी