गेला मान्सून कुणीकडे, महाराष्ट्राला पडला प्रश्न

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 15, 2022 | 13:10 IST

Monsoon 2022, Monsoon Alert, Rain Update, Rain Alert, Maharashtra Monsoon 2022 Update : महाराष्ट्रात मान्सून आला. राज्याच्या सर्व भागांमध्ये मान्सूनने आगमनाची वर्दी दिल्याचे चित्र निर्माण झाले. लोकांमध्ये पाऊस आल्यामुळे आनंदाचे वातावरण होते. एवढ्यात पावसानं ओढ दिली.

Monsoon 2022, Monsoon Alert, Rain Update, Rain Alert, Maharashtra Monsoon 2022 Update
गेला मान्सून कुणीकडे, महाराष्ट्राला पडला प्रश्न  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • गेला मान्सून कुणीकडे, महाराष्ट्राला पडला प्रश्न
  • मान्सूनच्या प्रगतीला अचानक ब्रेक
  • शेतीच्या कामांवर परिणाम

Monsoon 2022, Monsoon Alert, Rain Update, Rain Alert, Maharashtra Monsoon 2022 Update : मुंबई : महाराष्ट्रात मान्सून आला. राज्याच्या सर्व भागांमध्ये मान्सूनने आगमनाची वर्दी दिल्याचे चित्र निर्माण झाले. लोकांमध्ये पाऊस आल्यामुळे आनंदाचे वातावरण होते. एवढ्यात पावसानं ओढ दिली. मान्सून रविवारपासून सुटीवर गेल्याचं दिसतंय. 

मान्सूनच्या प्रगतीला अचानक ब्रेक लागल्यामुळे शेतीच्या कामांवर परिणाम झाला आहे. अनेकांनी पेरणीची कामं थांबवली आहेत. मान्सूनचे आगमन झाले तरी महाराष्ट्रात पाऊस पडण्यासाठी राज्याला खेटून असलेल्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणे आवश्यक असते. पण सध्या तशी स्थिती दिसत नाही. यामुळे महाराष्ट्रात मान्सून आला तरी राज्यात पावसानं ओढ दिल्याचं चित्र आहे.

याआधी मान्सून २९ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. नंतर मान्सून केरळ, तामीळनाडू आणि कर्नाटकमध्ये पोहोचला. मान्सूनची प्रगती सुरळीत होणार असे वाटत होते. पण दक्षिणेतील राज्यांची निराशा झाली. आता महाराष्ट्रातही पुन्हा तोच प्रकार थोड्या फरकाने सुरू आहे. राज्यात मान्सून आला पण पाऊस पडत नाही अशी परिस्थिती आहे. पावसाअभावी मुंबईत उकाडा वाढला आहे. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता आहे. अरबी समुद्रात गुजरातपासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर द्रोणीय स्थिती तसेच पश्चिमेकडून वाहणारे वारे यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या पाच दिवसांमध्ये पावसाची उपस्थिती दिसेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी