Weather Update : मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला; राज्यातील आगमनासाठी 12 जून ठरू शकतो मान्सूनचा नवा मुहूर्त, विदर्भात Heat Wave कायम

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 07, 2022 | 09:52 IST

कर्नाटकात (Karnataka) दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात (Karnataka-Goa border) रेंगाळलेला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra ) येण्याची शक्यता आहे.

when will the monsoon come to Maharashtra?
मान्सून कर्नाटकात दाखल तर महाराष्ट्रात येणार कधी?   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मॉन्सूनचा प्रवास संथगतीने सुरू असल्याने अरबी समुद्रापर्यंतच पावसाचा वेग आहे.
  • 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता
  • आज विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update : मुंबई : कर्नाटकात (Karnataka) दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा सीमाभागात (Karnataka-Goa border) रेंगाळलेला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra ) येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात मान्सून (monsoon) कधी दाखल होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या मान्सूनने कर्नाटक समुद्र किनारपट्टीचा बहुतांश भाग व्यापून गोव्याच्या सीमेवर आला आहे. यामुळे मान्सून लवकरच कोकणात दाखल होईल असं वाटतं होतं, परंतु मॉन्सूनचा प्रवास संथगतीने सुरू असल्याने अरबी समुद्रापर्यंतच पावसाचा वेग आहे. यामुळे महाराष्ट्रातील पावसाचे आगमन लांबले आहे.

सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण असल्यानं उकाडा चांगलाच वाढला आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. 
काही भागांत पुढील दोन-तीन दिवसांत मान्सूनपूर्व सरींचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण ईशान्य भारतासह सिक्कीम आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या विविध भागात मॉन्सून दाखल झाला आहे. तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाला आहे. यंदा मान्सून लवकर दर्शन देणार, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. पण मान्सून मात्र अद्याप महाराष्ट्राच्या सीमेवरच रेंगाळला आहे. काही दिवसांपासून मान्यून कर्नाटकातील कारवारमध्ये अडकला होता. आता तो मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगमनासाठी आता नवा मुहुर्त देण्यात आला आहे. 

Read Also : वाढू शकतो तुमच्या कर्जाचा हप्ता,बिघडू शकतो तुमचा बजेट

राज्यात अद्यापही उष्णतेची लाट (Heat Wave) जाणवत आहे. उष्ण लाटेने विदर्भ अक्षरशः भाजून निघत असल्याने उन्हाचा चटका असह्य होत आहे. काही जिल्ह्यांमधील कमाल तापमानात वाढ झाली आहे. आज विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मागच्या 24 तासांमध्ये विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात राज्यातील उच्चांकी 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर वर्धा, नागपूर येथे 45 अंशांपेक्षा अधिक, ब्रह्मपुरी, अकोला येथे 44 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढला आहे.

पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती असून, त्यापासून श्रीलंकेपर्यंत हवेचा कम दाबाचा पट्टा सक्रिय आहे.दरम्यान, पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 

Read Also : वाढत्या कोरोना संकटामुळे बीएमसीनं जारी केली मार्गदर्शक तत्वे

राज्यातील तापमानाची नोंद 

राज्यात मागच्या 24 तासांत पुणे 36.5, धुळे 40.3, जळगाव 41.4, कोल्हापूर 34.2, महाबळेश्वर 28.9, नाशिक 36.3, निफाड 37.4, सांगली 35.7, सातारा 37.9, सोलापूर 39.6, रत्नागिरी 34.6, औरंगाबाद 40.6, परभणी 42.7, नांदेड 40.6, अकोला 44.5, अमरावती 43.9, बुलडाणा 40.6, ब्रह्मपुरी 44.6, चंद्रपूर 43.2, गोंदिया 45.6, नागपूर 45.3, वाशीम 41.5, वर्धा 45.5, यवतमाळ 42.5 तापमानाची नोंद झाली.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी