Monsoon season 1St Day : कर्जमाफीसाठी पाच हजार कोटी; २५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या, एसटी महामंडळ, गुजराती भाषेसाठीही तरतूद

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 18, 2022 | 07:54 IST

राज्य विधिमंडळाच्या (State Legislature) पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) कालपासून सुरुवात झाली आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचं (Shinde-Fadnavis Government) पहिलं अधिवेशन असून काल विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. काही गोंधळ आणि आंदोलनाच्या ठरलेल्या पहिल्याच दिवशी सरकारने २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.

Monsoon season 1st Day : These provisions for farmers, ST corporations
Monsoon season 1st Day : शेतकरी, एसटी महामंडळसाठी या तरतूद  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी सर्वाधिक पाच हजार कोटी
  • एसटी महामंडळास एक हजार कोटींचे विशेष अर्थसहाय्य
  • गुजराती भाषा- साहित्याचा प्रचार करण्यासाठी गुजराती साहित्य अकादमीकरिता तीन लाख रुपये

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या (State Legislature) पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) कालपासून सुरुवात झाली आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचं (Shinde-Fadnavis Government) पहिलं अधिवेशन असून काल विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. काही गोंधळ आणि आंदोलनाच्या ठरलेल्या पहिल्याच दिवशी सरकारने २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. त्यात गुजराती भाषा (Gujarati Language) आणि साहित्याचा प्रचार करणे, आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांच्या मानधनाची थकबाकी, शेतकरी कर्जमुक्ती योजना, मुंबई -नागपूर समृद्धी महामार्ग (Mumbai-Nagpur Samriddhi Highway), एसटी कर्मचाऱ्यांसाठी तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून विरोधी पक्षाचा आज प्रस्ताव असणार आहे. त्यामुळे विरोधक शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, कायदा व सुव्यवस्था, शिंदे सरकारची स्थापना या मुद्यावर आक्रमक होतील. हीच आक्रमकता सभागृहाच्या बाहेरही पाहायला मिळेल. सकाळी दहाच्या आधी विरोधकांचं पाय-यांवर ही आंदोलन होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्यादिवशीही विरोध आक्रमक होते. सभागृहात गोंधळ झाला परंतु कामकाज पुढे चालू राहिल्यानं सरकारने काही पुरवण्या मागण्या सादर केल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे.  

Read Also : काबूल मशिदीत बॉम्बस्फोटात 20 जण ठार

राज्य सरकारकडून गुजराती भाषा आणि साहित्याचा प्रचार करण्यासाठी गुजराती साहित्य अकादमीकरिता तीन लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्यांना फडणवीस सरकारच्या काळात दरमहा मानधन सुरू करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारने हे मानधन बंद केले होते. राज्यात सत्ताबदल होताच भाजपच्या आग्रहामुळे हे मानधन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्याची दोन वर्षांची थकबाकी देण्यासाठी ११९ कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांसाठी काय आहेत तरतूद 

शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी सर्वाधिक ५ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांच्या मर्यादेत प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे आहे. तसेच खरीप हंगाम सन २०१९-२० आणि २०२०-२१मध्ये झालेल्या धान खरेदीतील सहभागी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान (बोनस) देण्याची महाविकास आघाडी सरकारने बंद केलेली योजना पुन्हा सुरू करण्यात आली असून, शेतकऱ्यांना बोनससाठी ५०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सोयाबीन खरेदी अनुदान लाभांशासाठी १६१ कोटी देण्यात आले आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम साजरा करण्यासाठी ७५ कोटी आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी ५०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 एसटी महामंडळासाठी हे घेतले निर्णय 

राज्य परिवहन महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाला भाजपने पाठिंबा दिला होता. त्यामुळे एसटी महामंडळास एक हजार कोटींचे विशेष अर्थसहाय्य आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या गाडय़ांचे इंधन भरण्यासाठी १० लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. महत्त्वाकांक्षी अशा मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतलेल्या कर्जाचे व्याज भरण्यासाठी १ हजार कोटी तर भागभांडवलापोटी एक हजार कोटी, अशी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद.

Read Also : सिद्धार्थ मल्होत्राने सांगितलं कियारा अडवाणीला करतोय डेट

या महामार्गाचा विस्तार म्हणून करण्यात येणाऱ्या जालना- नांदेड द्रुतगती महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाकरिता २५० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. रेवस- रेड्डी सागरी महामार्गासाठी भांडवली अंशदानपोटी ‘एमएसआरडीसी’ला १५० कोटी, अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी ३५० कोटी, ग्रामीण भागात मुलभूत सोई-सुविधा देण्यासाठी ३३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी