पुणे : मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी बरसल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्येही पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. मात्र म्हणावा तसा अजून आला नाही. त्यामुळे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, हवामान खात्याने ट्विट करून येत्या काही दिवसांच्या हवामानाची माहिती दिली आहे. हवामान खात्यानुसार, कोकण, गोवा, किनारपट्टी कर्नाटक आणि केरळ आणि माहे येथे पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
अधिक वाचा :
'चर्चा होऊ शकते, घरचे दरवाजे उघडे आहेत' राऊतांचं चर्चेचं आवाहन
हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार, आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील, परंतु पावसाची शक्यता नाही. तिथेही मान्सून लवकरच दाखल होणार आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने दणका दिला आहे. आता उत्तर भारताकडे वाटचाल होत असली तरी दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे.कर्नाटक, केरळ, गोवा आदी राज्यांत पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय कोकणामध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अधिक वाचा :
बंडखोरांसाठी मातोश्रीचे 'फाटक' रविंद्र उघडणार का?, दादा भुसे आणि संजय राठोडासोबत फाटक गुवाहाटीत
घाट माथ्यावर मुसळधार पाऊस असेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात हवामान विभागाने 24 आणि 25 तारखेला यलो अलर्ट दिला आहे. याशिवाय 23 आणि 24 तारखेला विदर्भात पाऊस पडेल. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात अजून म्हणावा तसा पावसाचा जोर नसल्याने पेरण्यांची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने शेतकरी बांधवांना करण्यात आले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.