महाराष्ट्रात मान्सून ७ ते १० जून दरम्यान येणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 28, 2022 | 07:25 IST

Monsoon will come in Maharashtra between 7 to 10 June 2022 : केरळमध्ये १ जूनपर्यंत आणि महाराष्ट्रात ७ ते १० जून दरम्यान मान्सूनचे आगमन होणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Monsoon will come in Maharashtra between 7 to 10 June 2022
महाराष्ट्रात मान्सून ७ ते १० जून दरम्यान येणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • केरळमध्ये १ जूनपर्यंत आणि महाराष्ट्रात ७ ते १० जून दरम्यान मान्सूनचे आगमन होणार
  • हवामान विभागाचा अंदाज
  • महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास संथगतीने होईल

Monsoon will come in Maharashtra between 7 to 10 June 2022 : मुंबई : केरळमध्ये १ जूनपर्यंत आणि महाराष्ट्रात ७ ते १० जून दरम्यान मान्सूनचे आगमन होणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास संथगतीने होईल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान विभागाने आधी केरळमध्ये मान्सून २७ मे पर्यंत पोहोचणार असा अंदाज वर्तविला होता. पण वातावरणातील बदलांचा आढावा घेऊन हवामान विभागाने सुधारित अंदाज जाहीर केला आहे. हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार २६ मे ते ८ जून या कालावधीत केरळपासून महाराष्ट्रापर्यंतच्या किनारपट्टीवर सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवसांत तुरळक पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तमिळनाडू, पुदुच्च्चेरी, कराईकल, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाबचा उत्तरेकडील भाग, हरयाणाचा उत्तरेकडील भाग, उत्तर प्रदेश, राजस्थानचा पूर्वेकडील भाग, मध्य भारत आणि ईशान्य भारत येथे पुढील चार ते पाच दिवसांत तुरळक पावसाची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी