जलप्रवास १५ रुपयांनी महागला

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 27, 2022 | 17:31 IST

mora to bhaucha dhakka ferry fare hike, mora to bhaucha dhakka ferry rate hike : मोरा ते भाऊचा धक्का हा जलप्रवास आता १५ रुपयांनी महागला आहे. आधी या जलप्रवासाकरिता ९० रुपये मोजावे लागत होते. आता या जलप्रवासाकरिता १०५ रुपये मोजावे लागणार आहेत. 

mora to bhaucha dhakka ferry fare hike, mora to bhaucha dhakka ferry rate hike
जलप्रवास १५ रुपयांनी महागला  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मोरा ते भाऊचा धक्का हा जलप्रवास आता १५ रुपयांनी महागला
  • आधी जलप्रवासाकरिता ९० रुपये मोजावे लागत होते
  • आता जलप्रवासाकरिता १०५ रुपये मोजावे लागणार

mora to bhaucha dhakka ferry fare hike, mora to bhaucha dhakka ferry rate hike : मुंबई : रायगड जिल्ह्यातील मोरा येथून मुंबईत भाऊचा धक्का पर्यंत नियमित जलप्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हा प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मोरा ते भाऊचा धक्का हा जलप्रवास आता १५ रुपयांनी महागला आहे. आधी या जलप्रवासाकरिता ९० रुपये मोजावे लागत होते. आता या जलप्रवासाकरिता १०५ रुपये मोजावे लागणार आहेत. 

दरवर्षी पावसाळी हंगामाच्या सुमारास जलप्रवासाच्या तिकिटांच्या दरात वाढ केली जाते. ही वाढ पुढे अनेक महिने कायम असते. यामुळे आता रायगड जिल्ह्यातील मोरा जेट्टी (बंदर) ते मुंबईत भाऊचा धक्का पर्यंतचा जलप्रवास करण्यासाठी एक मार्गी प्रवासाकरिता १०५ रुपये मोजावे लागणार आहेत.

ताज्या निर्णयानुसार मोरा जेट्टी ते भाऊचा धक्का या एक मार्गी प्रवासाकरिता लहानांसाठीचे तिकीट ५३ रुपये आणि मोठ्यांसाठीचे तिकीट १०५ रुपयांना उपलब्ध होणार आहे. समुद्रमार्गे मोरा जेट्टी ते भाऊचा धक्का हा प्रवास होतो. या प्रवासात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत नाही. प्रवास वेगाने, आरामात आणि सुखद वातावरणात पार पडतो. याच कारणामुळे मोरा जेट्टी ते भाऊचा धक्का आणि भाऊचा धक्का ते मोरा जेट्टी असा प्रवास नियमित करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांना दरवाढीचा फटका बसणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी