Dahihandi Govinda Injured : मुंबईत दहीहंडी फोडताना २२२ गोविंदा जखमी, ठाण्यातही जखमींची संख्या लक्षणीय

मुंबई, ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी झाली. परंतु दहीहंडी फोडताना मुंबई ठाण्यात अडीचशेहून अधिक गोविंदा जखमी झाले आहेत, त्यामुळे या सणाला गालबोट लागले. बहुतांश जखमी गोविंदांना रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर यात २३ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

dah handi 2022
गोविंदा २०२२ 
थोडं पण कामाचं
  • मुंबई, ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी झाली.
  • परंतु दहीहंडी फोडताना मुंबई ठाण्यात अडीचशेहून अधिक गोविंदा जखमी झाले आहेत.
  • बहुतांश जखमी गोविंदांना रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.

Dahihandi Injured :  मुंबई : मुंबई, ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी झाली. परंतु दहीहंडी फोडताना मुंबई ठाण्यात अडीचशेहून अधिक गोविंदा जखमी झाले आहेत, त्यामुळे या सणाला गालबोट लागले. बहुतांश जखमी गोविंदांना रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर यात २३ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. एकट्या ठाण्यात ६४ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी १२ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. (more than 200 people injured in dahihandi festival inn mumabai and thane )

अधिक वाचा : Auto Taxi Fair : CNG च्या किंमती कमी, तरी रिक्षा टॅक्सी युनियन प्रवास भाडे वाढवण्यावर ठाम

गेल्या दोन वर्षांत दही हंडीसह अनेक सणांवर कोरोनामुळे निर्बंध होते. यंदा सर्व सणांवर निर्बंध हटवण्यात आले आहेत. शुक्रवारी मुंबई, ठाण्यासह राज्यात मोठ्य उत्साहात गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. मुंबई आणि ठाण्यात अनेक राजकीय हंड्या फोडण्यात आल्या.

 
#reel ठाण्यात दहीहंडी लावताना एक गोविंदा जखमी #thane #dahihandi Posted by Times Now Marathi on Saturday, August 20, 2022

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार १९७ जखमी गोविंदांवर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या २५ जखमी गोविंदांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. २२२ जखमी गोविंदांपैकी ५८ गोविंदांवर केईम रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर राजावाडी आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात प्रत्येकी २ रुग्णांवर तर सायन रुग्णालयात १९ आणि कूपर रुग्णालयात १७ गोविंदांवर उपचार करण्यात आले. तसेच १३ जखमी गोविंदावर जीटी रुग्लाण, पाच सेंट जॉर्ज रुग्णालयत आणि ३ जखमी गोविंदांवर जेजे रुग्णालयत उपचार करण्यात आले. इतर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  

अधिक वाचा : Eknath Shinde : मला तरी मुख्यमंत्री झाल्यासारखं अजून वाटत नाही - एकनाथ शिंदे

ठाण्यात ६४ गोविंद जखमी झाले होते. बहुतांश जखमींवर उपचार करून घरी सोडण्यात आले होते. सध्या ९ जखमी गोविंदावर उपचार सुरू आहेत, त्यात कळवा सिविल हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय आणि कौसल्या रुग्णलयात उपचार सुरू आहेत.

अधिक वाचा : Jai Jawan Dahihandi Mandal : जय जवान मंडळाचा 10 थरांचा विक्रम थोडक्यात हुकला 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी