राज्यात आरटीईच्या २४ हजार ९४२ जागा रिक्त

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 22, 2022 | 19:28 IST

more than 24 thousand Right To Education Seats Vacant In Maharashtra : शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार महाराष्ट्रातील खासगी शाळांमधील २५ टक्के आरटीईच्या राखीव जागांवरील प्रतीक्षा यादीत असलेल्या मुलांच्या प्रवेशाला २८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

more than 24 thousand Right To Education Seats Vacant In Maharashtra
राज्यात आरटीईच्या २४ हजार ९४२ जागा रिक्त  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • राज्यात आरटीईच्या २४ हजार ९४२ जागा रिक्त
  • प्रवेशाला २८ जूनपर्यंत मुदतवाढ
  • राज्यात २४ हजार ९४२ जागा अद्याप रिक्त

more than 24 thousand Right To Education Seats Vacant In Maharashtra : मुंबई : शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार महाराष्ट्रातील खासगी शाळांमधील २५ टक्के आरटीईच्या राखीव जागांवरील प्रतीक्षा यादीत असलेल्या मुलांच्या प्रवेशाला २८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. राज्यातील शाळांमध्ये आरटीईच्या उपलब्ध जागांपैकी तब्बल २४ हजार ९४२ जागा रिक्त राहिल्या आहेत. मुंबईत ही संख्या ३ हजार २०५ आहे. या जागांवर प्रवेश व्हावेत, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली. 

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आरटीई प्रवेशाच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यासाठी प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या टप्प्यात प्रवेश देण्याची मुदत ही २१ जूनपर्यंत देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही असंख्य शाळांनी पालकांना प्रवेश देण्यासाठी नकार दिल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या. त्या जागांवर प्रवेश व्हावेत, यासाठी शिक्षण संचालनालयाने ही मुदतवाढ दिली आहे. 

मुंबईत आरटीई प्रवेशासाठी असलेल्या ३४१ शाळांमध्ये ६ हजार ४५१ जागा उपलब्ध आहेत. पण मुंबईत आतापर्यंत ३ हजार २४६ जागांवरच प्रवेश झाले आहेत आणि ३ हजार २०५ जागा रिक्त आहेत. राज्यातील ९ हजार ८६ शाळांमध्ये १ लाख ९०६ आरटीई प्रवेशाच्या जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी आतापर्यंत ७६ हजार ९६४ जागांवर प्रवेश झाले. उर्वरित २४ हजार ९४२ जागा अद्याप रिक्त आहेत.

रिक्त जागा लवकर भराव्यात यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीसमोर पहिली ते आठवी व नववी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींसाठी प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अनुक्रमे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्यावर असणार आहे. बृहन्मुंबई शहरासाठी संबंधित शिक्षण निरीक्षक यांनी प्रस्तावांची छाननी करून समितीसमोर सादर करावेत, असे यासंबंधीच्या सरकार निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी