Corona patients increased in Maharashtra : राज्यात आढळले कोरोनाचे ९ हजारहून अधिक रुग्ण, एकट्या मुंबईत आढळले ६ हजारहून अधिक रुग्ण

Corona patients increased in Maharashtra देशात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढले आहे. गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ९ हजारहून रुग्ण आढळले आहेत. तसेच मुंबईत तीन हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ओमिक्रॉनचे ६ रुग्ण आढळले आहेत. 

corona virus
कोरोना व्हायरस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • देशात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढले आहे.
  • गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ९ हजारहून रुग्ण आढळले
  • मुंबईत तीन हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

Corona patients increased in Maharashtra : मुंबई : देशात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढले आहे. गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ९ हजारहून रुग्ण आढळले आहेत. तसेच मुंबईत तीन हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ओमिक्रॉनचे ६ रुग्ण आढळले आहेत. (more than 9 thousand corona patients found in maharashtra 6 patients omicron )


गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ९ हजार १७० रुग्ण आढळेल आहेत. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३२ हजार २२५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत १ हजार ४४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २४ तासांत राज्यात ओमिक्रॉनचे ६ रुग्ण आढळले आहेत त्यामुळे एकूण ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ४६० वर गेली आहे. 

मुंबईत ६ हजारहून अधिक रुग्ण
गेल्या २४ तासांत मुंबईत कोरोनाचे ६ हजार ३४७ रुग्ण आढळले आहेत. सध्या मुंबईत २२ हजार ३३४ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत ४५१ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण सध्या ९५ टक्के इतके आहे. 
 


पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण

भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली होती.  पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.  कोरोना बाधित लोकांच्या संपर्कात आल्यानंतर आपण विलग झाले होते. पण कोरोना चाचणी केली तेव्हा मुंडे यांना कोरोनाची लक्षण आढळली आणि कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन मुंडे यांनी केले आहे.  

सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना झाली होती लागण
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण झाली होती. जे जे आपल्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोरोना चाचणी करावी तसेच काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले होते.

राज्यातील २० आमदारांना कोरोनाची लागण
नुकतेच महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन मुंबईत पार पाडले. या अधिवेशनानंतर १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. 

राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांचे शाहीविवाह सोहळे
राजकीय नेत्यांच्या मुलांच्या शाही विवाह सोहळा रंगला. यात मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार संजय राऊत,माजी खासदार प्रफुल्ल पटेल,  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, उदयसिंह रजपूत, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा समावेश होता. यातील बहुतांश लग्नांना राज्यातील मान्यवर नेते उपस्थित राहिले. 

अनेक नेत्यांवर उपचार सुरु

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यासह १० मंत्री आणि २० आमदार पाॅझिटिव्ह झाले आहेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी