BMC:  मुंबईतील रस्त्यांवरील किती खड्डे भरले? मुंबई महानगरपालिकेने दिले उत्तर

काही दिवसांपूर्वी ठाण्यातील घोडबंदर येथे रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकार्‍यांना फैलावर घेतले आणि अशी घटना पुन्हा होता कामा नये अशी सूचन केली होती. त्यानंतर राज्यातील रस्ते आणि खड्ड्यांवरील प्रश्न ऐरणीवर आला होता. मुंबईतही अनेक रस्त्यांवर खड्डे असतात आणि पावसाळ्यात या खड्ड्यांचे रुपांतर डबक्यात होतं. आता मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवर मुंबई महानगरपालिकेने स्पष्टीकरण दिले आहे.

mumbai potholes
मुंबई रस्त्यावरील खड्डे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काही दिवसांपूर्वी ठाण्यातील घोडबंदर येथे रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
  • त्यानंतर राज्यातील रस्ते आणि खड्ड्यांवरील प्रश्न ऐरणीवर आला होता.
  • आता मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवर मुंबई महानगरपालिकेने स्पष्टीकरण दिले आहे.

Mumbai Road Pothole : मुंबई : काही दिवसांपूर्वी ठाण्यातील घोडबंदर येथे रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकार्‍यांना फैलावर घेतले आणि अशी घटना पुन्हा होता कामा नये अशी सूचन केली होती. त्यानंतर राज्यातील रस्ते आणि खड्ड्यांवरील प्रश्न ऐरणीवर आला होता. मुंबईतही अनेक रस्त्यांवर खड्डे असतात आणि पावसाळ्यात या खड्ड्यांचे रुपांतर डबक्यात होतं. आता मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवर मुंबई महानगरपालिकेने स्पष्टीकरण दिले आहे. एप्रिल पासून मुंबईतील किती खड्डे बुजवण्यात आले याची आकडेवारी मुंबई महानगर पालिकेने दिली आहे.

एक एप्रिल ते ७ जुलै दरम्यान मुंबईच्या रस्त्यांवरील ७ हजार २११  खड्डे बुजवण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. २०२२ या वर्षातील एक एप्रिल ते ७ जुलै चार महिन्यांच्या कालावधीत पालिकेने आपल्या अखत्यारितील रस्त्यांवरील ७ हजार २११ खड्डे भरले आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी दिली आहे. पालिकेने १२ हजार ६३५ वर्ग मीटर भागातील हे खड्डे बुजवले आहेत. महानगर पालिकेने नागरिकांना खड्ड्यांच्या समस्येबद्दल वेबसाईट, मोबईल ऍप, सोशल मीडिया, टोल फ्री क्रमाकांच्या माध्यमातून तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई शहरात २ हजार ५५ किमी रस्ते आहेत त्यात १ हजार २५५ किमी रस्ते हे डांबराचे तर ८०० किमी रस्ते हे काँक्रीटचे आहेत. पावसात या डांबराच्या रस्त्यांवर खड्डे पडतात. त्यामुळे दरवर्षी पालिका प्रशासन हे खड्डे बुजवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. यावेळी नागरिकांना खड्ड्यांबद्दल तक्रार करण्याचे आवाहन पालिकेने केले होते. तक्रार प्राप्त झाल्यानंतर ४८ तासांच्या आत हा खड्डा भरला जातो. हे खड्डे भरण्यासाठी कोल्डमिक्स तंत्र वापरले जाते. या तंत्रात २४ तासांत खड्डे भरले जातात. वरळीत डांबरचा प्रकल्प असून इथून कोल्डमिक्स २४ वॉर्डांना पुरवले जाते. आतापर्यंत २४ वॉर्डात २ हजार ४२२ मेट्रिक टन ड्राय कोल्ड मिक्सचा पुरवठा करण्यात आला आहे.

दरवर्षी एका वॉर्ड रस्त्यांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिला जातो. त्यापैकी ५० लाख रुपये हे फक्त खड्डे भरण्यासाठी वापरले जातात. मुंबईत एकूण २४ वॉर्ड आहेत. मुंबई महानगरपालिकेने हे खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी ऑनलाई वेबसाईट, ऍप, टोल फ्री नंबर, तसेच सोधल मीडियाचा पर्याय दिला आहे.

  1. ऑनलाइन पोर्टल / ऐप: MyBMCPothole fixit app
  2. आपात्कालीन क्रमांक: 1916
  3. टोल फ्री टेलीफोन क्रमांक: 1800221293
  4. ट्विटर: @mybmcroads
  5. बीएमसी व्हाट्सएप क्रमांक: 91-8999-22-8999

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी