MIM चा मोर्चा थोपविण्यासाठी मुंबईत आंदोलन बंदी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 11, 2021 | 16:22 IST

Movement banned in Mumbai to stop MIM's march एमआयएमने मुस्लिम समाजास आरक्षण मिळावे आणि महाराष्ट्रातील वक्फ मालमत्तेचे संरक्षण व्हावे यासाठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोर्चा आज (शनिवार ११ डिसेंबर २०२१) मुंबईत धडकेल.

Movement banned in Mumbai to stop MIM's march
MIM चा मोर्चा थोपविण्यासाठी मुंबईत आंदोलन बंदी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • MIM चा मोर्चा थोपविण्यासाठी मुंबईत आंदोलन बंदी
  • मुंबईत रविवार १२ डिसेंबर २०२१ रोजी रात्री बारा वाजेपर्यंत मोर्चे, आंदोलन आणि रॅलीला परवानगी नाकारण्यात आली
  • खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात एमआयएमचा मोर्चा मुंबईत धडकणार

Movement banned in Mumbai to stop MIM's march मुंबईः एमआयएमने मुस्लिम समाजास आरक्षण मिळावे आणि महाराष्ट्रातील वक्फ मालमत्तेचे संरक्षण व्हावे यासाठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोर्चा आज (शनिवार ११ डिसेंबर २०२१) मुंबईत धडकेल. एमआयएमच्या या मोर्चाला थोपविण्यासाठी मुंबईत आंदोलन बंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी उद्या म्हणजेच रविवार १२ डिसेंबर २०२१ रोजी रात्री बारा वाजेपर्यंत राहील. 

मुंबई पोलिसांनी आंदोलन बंदीचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार मुंबईत रविवार १२ डिसेंबर २०२१ रोजी रात्री बारा वाजेपर्यंत मोर्चे, आंदोलन आणि रॅलीला परवानगी नाकारण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या हद्दीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात एमआयएमचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. खासदार जलील ३००पेक्षा जास्त कारचा ताफा घेऊन औरंगाबागहून मुंबईत येत आहेत. मुंबईत आंदोलकांसमोर असदुद्दीन औवैसी यांचे भाषण होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी