संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी शिवसेनेच्या गोटात हालचाली सुरु, विश्वसनीय सूत्रांची माहिती

मुंबई
अजहर शेख
Updated Feb 25, 2021 | 15:58 IST

Movements started for the resignation of Sanjay Rathore: संजय राठोड यांनी गर्दी जमवने हेच कारण त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि याच कारणामुळे संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो.

Movements started for the resignation of Sanjay Rathore?
राठोडांच्या राजीनाम्यासाठी शिवसेनेच्या गोटात हालचाली सुरु  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पोहरादेवी येथे गर्दी जमवून केलेले शक्तीप्रदर्शन भोवणार असल्याची चर्चा
  • संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनावर शरद पवार नाराज असल्याची चर्चा सूत्रांची माहिती
  • राठोड यांना तब्बल पावणेदोन तास ताटकळत राहावे लागले - सूत्र 

मुंबई : पूजा चव्हाणच्या या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली असून, यामध्ये संजय राठोड यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. दरम्यान राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर राठोड हे १५ दिवस गायब होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर भाजपचे अनेक नेते समोर येऊन भाजपकडून संजय राठोड यांचा राजीनाम्याची मागणी करत आहे. दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा लवकरच राजीनामा घेतला जाण्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून हाती आली आहे. त्यादृष्टीने शिवसेनेच्या (Shivsena) गोटात हालचाली देखील सुरु झाल्याचे माहिती मिळाली आहे.

पोहरादेवी येथे गर्दी जमवून केलेले शक्तीप्रदर्शन भोवणार असल्याची चर्चा

वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे हजारो कार्यकर्ते जमवून शक्तीप्रदर्शन केले होते. त्यामुळे, शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील नाराजी ओढावून घेतली असल्याचे समजते. त्यामुळे राठोड यांनी गर्दी जमवने हेच कारण त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि याच कारणामुळे संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच राठोड यांनी राजीनामा पाठवल्याच्या चर्चा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वनमंत्री संजय राठोड यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला होता. मात्र, राठोड यांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला नव्हता. वाढत असलेला दबाव आणि राठोड यांनी जमवलेली गर्दी या कारणामुळे उद्धव ठाकरे हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनावर शरद पवार नाराज असल्याची चर्चा सुत्रांची माहिती

दरम्यान संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे केलेल्या शक्तिप्रदर्शनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान संजय राठोड यांचे हजारो कार्यकर्ते पोहोरादेवी गडावर दाखल झाले असल्यामुळे अनेकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली होती. 

राऊत यांनी दिला सूचक इशारा?

दरम्यान, संजय राठोड यांनी गर्दी जमवल्याप्रकरणी संजय राऊत यांना विचारले असता, ते म्हणाले की, कोरोना काळात जे नियमांच उल्लंघन झाल यांची गंभीर दाखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. याबाबत कडक कारवाईचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्थेत कठोर आहेत. कुणी आपला असेल तरी मुख्यमंत्री त्याला सोडणार नाहीत. असा सूचक इशारा राऊत यांनी दिला होता.  

राठोड यांना तब्बल पावणेदोन तास ताटकळत राहावे लागले - सूत्र 

संजय राठोड हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. राठोड यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तब्बल पावणेदोन तास ताटकळत राहावे लागले होते. त्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी केवळ दोन मिनिटे चर्चा करुन काढता पाय घेतला होता. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हा सारा घटनाक्रम पाहता उद्धव ठाकरे संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी