Hanuman Chalisa Row : मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा म्हटल्याप्रकरणी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. अखेर आज या दाम्पत्याला कोर्टाने जामीन मंजूर करण्यात आला आहे. अटी शर्थींसह राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. आज सांयकाळी किंवा उद्यापर्यंत राणा दाम्पत्य तुरुंगाबाहेर येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Court has granted bail to Navneet Rana&Ravi Rana. Some conditions have been imposed. They've been asked to cooperate in the investigation & interrogation. Police have also been directed to issue an advance notice of 24 hours to them: Rizwan Merchant, advocate of Navneet-Ravi Rana pic.twitter.com/K7TOqkVQBf
— ANI (@ANI) May 4, 2022
नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरातील मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठन करणार असल्याचे जाहीर केल्यावर संपूर्ण वादाला सुरुवात झाली. या घोषणेनंतर शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नवनीत राणांविरोधात निदर्शने केली. त्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार पती रवी राणा यांनी मात्र 23 एप्रिल रोजी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची त्यांची योजना रद्द केली. मात्र पोलिसांनी त्यांना अटक करून कारागृहात पाठवले. कोर्टाने राणा दाम्पत्याला १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. अखेर आज राणा दाम्पत्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Another condition is that no hamering or tampering to be done with evidence. They are not allowed to give any sort of interview to the media. Hopefully, they will be released by today's evening: Rizwan Merchant, advocate of Navneet-Ravi Rana
— ANI (@ANI) May 4, 2022
अटी शर्थींसह राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यात राणा दाम्पत्याला माध्यमांशी बोलण्यास राणा दाम्पत्याला मनाई करण्यात आली आहे. तसेच जेव्हा जेव्हा पोलीस आदेश देतील तेव्हा पोलीस स्थानकात हजर राहण्याची अट राणा दाम्पत्याला देण्यात आली आहे. यासाठी पोलीस यासाठी २४ तासांपूर्वी नोटीस जारी करतील. चौकशी आणि तपास कार्यात सहकार्य करण्याची अटही कोर्टाने ठेवली आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन झाल्यास तत्काळ जामीन रद्द होईल अशी कोर्टाने म्हटले आहे.
राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाल्यानंतर सरकारी वकील प्रदीप घरत यांची प्रतिक्रिया#NavneetRana #ravirana #HanumanChalisaRow pic.twitter.com/etlLJs2nFw
— Timesnowmarathi (@timesnowmarathi) May 4, 2022
तास युक्तिवाद केला. राणा दाम्पत्यावर धार्मिक भावना भडकावल्याचा आणि देशद्रोहाचा आरोप आहे.दरम्यान, आमदार रवी राणा यांच्याविरोधात 17, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात 6 गुन्हे दाखल आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.