MPSC Interview Schedule 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेला गती आली आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात भरती प्रक्रिया लांबली होती. मात्र आता राज्यातील सर्वच विभागातील रिक्त जागांची माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार सुमारे 15 हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यापैकी 8 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. राहिलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 ( जा.क्र. 61/2021) चा लेखी परीक्षेचा निकाल 25 मार्च 2022 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आला. या परीक्षेनंतर आता मुलखतीची पायरी असते, आयोगाकडून मुलखती कधी घेतल्या जाणार याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस अर्हताप्राप्त ठरवलेल्या उमेदवाऱांच्या मुलाखती 9 मे ते 13 मे 2022, 23 ते 27 मे तसेच 30 ते 31 मे 2022 या कालावधीत पुणे जिल्हा परिषद, याठिकाणी आय़ोजित करण्यात आल्या आहेत. सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईट MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा - https://mpsc.gov.in/
मुलाखतीस पात्र उमेदवारांना मुलाखत पत्र त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. तसेच या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांना संदेशाव्दारे कळविण्यात येत आहे. मुलाखतीस पात्र उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी प्रमाणपत्रे, कागदपत्रे तपासणीवेळी सादर करणे आवश्यक आहे, ती सादर न केल्यास मुलाखत घेतली जाणार नसल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मूळ कागदपत्रे सादर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचंही नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान कोरोना महामारीचा काळ असल्याने त्याचा नियमांचे उमेदवारांना पालन करावे लागणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व सुचना व आदेश यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचंही आयोगाने नमूद केले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.