MPSC पूर्व परीक्षा रविवार २३ जानेवारीला होणार!

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 15, 2022 | 00:36 IST

MPSC pre-examination will be held on Sunday 23rd January! : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेतल्या जाणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेची नवी तारीख जाहीर झाली आहे. आता 'राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१' रविवार २३ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे.

MPSC pre-examination will be held on Sunday 23rd January!
MPSC पूर्व परीक्षा रविवार २३ जानेवारीला होणार! 
थोडं पण कामाचं
  • MPSC पूर्व परीक्षा रविवार २३ जानेवारीला होणार!
  • परीक्षेसाठी येणाऱ्या परीक्षार्थींना योग्य प्रवेशपत्र दाखवावे लागेल
  • कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे सक्तीचे

MPSC pre-examination will be held on Sunday 23rd January! : मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेतल्या जाणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेची नवी तारीख जाहीर झाली आहे. आता 'राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१' रविवार २३ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. याआधी 'राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१' २ जानेवारी रोजी होणार होती. पण ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. परीक्षेची नवी तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक ट्वीट करण्यात आले आहे.

परीक्षेसाठी येणाऱ्या परीक्षार्थींना योग्य प्रवेशपत्र दाखवावे लागेल. हे प्रवेशपत्र (प्रवेश प्रमाणपत्र) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवरुन डाऊनलोड करण्याचे आवाहन उमेदवारांना करण्यात आले आहे. योग्य प्रमाणपत्र असेल तरच परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल.

परीक्षेबाबत इतर सर्व शंकाकुशंकांचे निरसन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवरील माहिती जाणून घेतल्यास होईल. परीक्षेच्या दिवशी अडचण जाणवली तर थेट आयोगाशी संपर्क साधून अडचणी सोडविता येतील

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी