MPSC exam postponed: MPSC परीक्षा पुढे ढकलली, संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलन

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 11, 2021 | 15:47 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणआरी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेला तीन दिवस शिल्लक असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.

MPSC preliminary examination postponed due to covid19 cases increasing in Maharashtra
फोटो सौजन्य: @CharwakaJain Twitter  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली 
  • १४ मार्च रोजी होणार होती एमपीएससीची पूर्व परीक्षा
  • राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा घेण्यात आला निर्णय 

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (Maharashtra Public Service Commission)मार्फत रविवारी दिनांक १४ मार्च २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही पुढे ढकलण्यात आली (MPSC postponed state service preliminary examination) आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर परीक्षेचा सुधारित दिनांक हा अद्याप जाहीर करण्यात आलेला नसून तो लवकरच जाहीर कऱण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. (MPSC preliminary examination postponed due to covid19 cases increasing in Maharashtra)

संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलन 

१४ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी राज्यातील विविध भागातील विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर आधीच पोहोचले आहेत आणि तयारी सुद्धा त्यांची पूर्ण झाली आहे. मात्र, ऐन तीन दिवसांपूर्वी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी चांगलेच संतप्त झाल्याचं पहायला मिळत आहे. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी संतप्त होत रत्त्यावर उतरुन आंदोलन सुरू केलं आहे.

निर्णयावर तातडीने फरविचार झालाच पाहीजे - सत्यजित तांबे

एमपीएससीची परीक्षा अचानक पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पद्धतीने अचानक परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? या निर्णयावर तातडीने फरविचार झालाच पाहीजे असं ट्विट युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केलं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं प्रसिद्धीपत्रक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी दिनांक १४ मार्च २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून दिनांक १० मार्च २०२१ रोजीच्या पत्राद्वारे आयोगास खालीलप्रमाणे कळविण्यात आले आहे. "राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात यावी." शासनाकडून घेण्यात आलेल्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही पुढे ढकलण्यात येत आहे. प्रस्तुत परीक्षेचा सुधारित दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी