MPSC Prelims Result: MPSC पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; उत्तीर्ण नावासाठी नको पळापळ, येथे पहा यादी

मुंबई
भरत जाधव
Updated Mar 31, 2022 | 10:07 IST

कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  2021 या वर्षातील परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच 23 जानेवारी 2022 ला ही परीक्षा (Exam) घेण्यात आली होती. दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचा (MPSC Prelims) निकाल जाहीर झाला आहे.

MPSC Prelims results announced
महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर  |  फोटो सौजन्य: Google Play

MPSC Exam 2021 : मुंबई : कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  2021 या वर्षातील परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच 23 जानेवारी 2022 ला ही परीक्षा (Exam) घेण्यात आली होती. दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचा (MPSC Prelims) निकाल जाहीर झाला आहे. MPSC च्या अधिकृत वेबसाईटवर पूर्व परीक्षा उत्तीर्ण (Result) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षा येत्या 7, 8 आणि 9 मे 2022 रोजी घेण्यात येणार आहे. 

MPSC पूर्व परीक्षा देणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे असे विद्यार्थी थेट मुख्य परीक्षेसाठी (MPSC Mains Exam 2022) पात्र ठरले आहेत. मात्र त्याआधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काही सूचना जारी केल्या आहेत. MPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा काही अटींच्या अधीन राहून देता येणार आहे.

काय आहेत यादी 

  • मुख्य परीक्षेआधी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पात्रता तपासणी करण्यात येणार आहे. या पात्रता तपासणीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील, अशाच उमेद्वाराना मुख्य परीक्षा देता येणार आहे.
  • जे उमेदवार मुख्य परीक्षा देण्यासाठी आयोगामार्फत देण्यात आलेल्या तारखेच्या आधी अर्ज भरतील आणि शुल्क भरतील, त्यांनाच मुख्य परीक्षेला बसता येणार आहे.
  • उमेदवारांची आवश्यक ती पात्रता तपासणी झाल्यानंतर तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. 
  • पूर्व परीक्षेचा निकाल हा कोणत्याही आरक्षणाच्या / समांतर आरक्षणाच्या / इतर मुद्यांसंदर्भात विविध मा.न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात आला आहे.
  • प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे कळवण्यात येणार आहे.
  • मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवश्यक माहिती आणि परीक्षा शुल्क विहित मुदतीत दिलेल्या पद्धतीने सादर करणे आवश्यक असेल अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
  • उमेदवारांनी जी माहिती पूर्व परीक्षेआधी आयोगाच्या वेबसाईटवर दिली होती तीच माहिती मुख्य परीक्षेसाठी स्वीकार्य असणार आहे. याशिवाय कोणतीही माहिती असल्यास आयोगाचा निर्णय असणार आहे.

MPSC पूर्व परीक्षा  उत्तीर्ण उमेदवारांची यादी साठी नको पळापळ येथे करा क्लिक ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी