MPSC Application Deadline : राज्य सेवा पूर्व परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत वाढवली, कधी भरायचा शेवटचा अर्ज पाहा

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 31, 2021 | 09:45 IST

MPSC Application Deadline : राज्यातील MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा (State Service Pre Exam) 2021 करिता अर्ज सादर करण्याचा अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे.

State Service Pre-Examination Application Deadline Extended,
राज्य सेवा पूर्व परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत वाढवली,  |  फोटो सौजन्य: Times Now

MPSC Application Deadline : मुंबई: राज्यातील MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा (State Service Pre Exam) 2021 करिता अर्ज सादर करण्याचा अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. ही तारीख (Date) दोन दिवसांनी वाढवण्यात आली असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर होती. ही तारीख वाढवण्यात आली असून 2 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली आहे. राज्य सरकार वतीने याची माहिती देण्यात आली आहे. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी भरती करण्यात येणार होती. मात्र या पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आली. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदतही वाढवण्यात आली आहे.

एकूण 100 पदे वाढल्यामुळे आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे. या पदांचे अर्ज वेबसाईटवर जाऊन भरावे लागणार आहेत. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी mpsc.gov.in या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी