MPSC new exam pattern: "MPSC चा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार" महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची माहिती

मुंबई
सुनिल देसले
Updated Feb 23, 2023 | 17:46 IST

MPSC new exam pattern will implement from 2025: एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात येणार आहे.

mpsc will implement new exam pattern from year 2025 annouce by maharashtra public service commission mpsc gov in
MPSC new exam pattern: "MPSC चा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार" महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची माहिती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निर्णय जाहीर

MPSC Exam New Patter : एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांनी केली होती आणि त्यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलनही सुरू होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची दखल राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतली होती. नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याबाबत राज्य सरकारने एमपीएससीला विनंती केली होती. या विनंतीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचं जाहीर केलं आहे.

एमपीएससीने म्हटलं, "राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत आहे."

हे पण वाचा : मधुमेह असल्यास कोणती फळे खावीत?

या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचं स्वागत आहे. एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत होते तेव्हा मी स्वत: त्यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चर्चा केली होती. शासन सुद्धा विद्यार्थ्यांच्या भूमिकेशी सहमत होतं. या संदर्भात आम्ही एमपीएससीला विनंती केली होती त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा : 10वी, 12वी पास सुद्धा चालवू शकतात ट्रेन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटलं, यामध्ये आम्हाला कोणतंही राजकीय श्रेय घ्यायचं नाही आणि घ्यायची आवश्यकताही नाही. पण काहीजण त्यात विद्यार्थ्यांच्या आडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत होते. नवीन अभ्यासक्रमाचा निर्णय मविआ सरकारने घेतला होता पण तरी सुद्धा या विषयाला नवीन सरकारसोबत जोडत होते. आम्ही विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करुन सकारात्मक निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी