मिसेस फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण; आधी मुलगी आता बाप बुकी अनिल जयसिंघानीला अटक

मुंबई
भरत जाधव
Updated Mar 20, 2023 | 13:46 IST

गेल्या 7 वर्षांपासून फरार असलेल्या अनिल जयसिंघाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरातमध्ये अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आली आहे. 

bookie Anil Jaisinghani arrested in Gujarat
कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमध्ये अटक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जयसिंघानी याच्या इशाऱ्यावरून त्याची मुलगी अनिक्षाने अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे.
  • काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली
  • मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरातमध्ये ही कारवाई केली आहे.

मुंबई :  गेल्या 7 वर्षांपासून फरार असलेल्या अनिल जयसिंघाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरातमध्ये अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आली आहे. 

अधिक वाचा  : जोडीदाराशी मेसेजमध्ये या गोष्टी नका बोलू, नाहीतर...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृत फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचा  आरोप आहे. जयसिंघानी याच्या इशाऱ्यावरून त्याची मुलगी अनिक्षाने अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. जयसिंघानी याच्या इशाऱ्यावरून त्याची मुलगी अनिक्षाने अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अनिक्षालाही काही दिवसापूर्वी अटक केली आहे. 

अनिक्षा जयसिंघानीला अटक  

अनिक्षा जयसिंघानी ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. तिच्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे.

अधिक वाचा  : Daily Horoscope: चार राशींना होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या तुमचं भविष्य

तर अनिल जयसिंघानी हा कुख्यात क्रिकेट बुकी असून गेल्या 7 वर्षांपासून वॉन्टेड आहे. त्याच्यावर पाच  राज्यांमध्ये 17 हून अधिक गुन्हे दाखल आहे. हा मोठा गुन्हेगार असून त्याच्याविरोधात लुकआउट सर्क्युलरही काढण्यात आले आहे.  तरीही तो पोलिसांच्या हाती येत नव्हता. पण मुंबई पोलिसांना त्याला पकडण्यात यश आलं. तो तांत्रिक बाबीच्या माध्यमातून आपली ओळख लपवत होता.  

72 तास चालू होती कारवाई 

पोलिसांनी अनिल जयसिंघानीला पकडण्यासाठी पाच सर्च ऑपरेशन केलं. ग्रोधा येथे पळून  जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखेने गुजरात पोलिसांच्या मदतीने जयसिंघानीला अटक केली आहे. पोलीस त्याला आजच मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. गुजरातच्या कलोलमध्ये जयसिंघानीला अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी