MSBSHSE HSC Result 2022 announce shortly  : बारावी (HSC) बोर्डाचा निकाल आता काही वेळातच 

MSBSHSE HSC Result 2022 announce shortly :    महाराष्ट्र राज्य मंडळ आणि उच्च माध्यमिक शिक्षण (MHBHSE) आज बारावीचा (HSC Result 2022) निकाल थोड्याच वेळात म्हणजे १ वाजता जाहीर होणार आहे. या संदर्भातील माहिती काल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतील.

MSBSHSE HSC Result 2022 announce shorty at mahresult nic in www.hscresult.mkcl.org, http://hsc.mahresults.org.in
बारावी (HSC) बोर्डाचा निकाल आता थोड्याच वेळात   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • महाराष्ट्र राज्याच्या उच्च माध्यमिक बोर्डाचा बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार 
 • ही परीक्षा 4 मार्च ते 07 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात आली होती.
 • खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही निकाल पाहू शकता.

Maharashtra HSC Result 2022, MSBSHSE 12th Result, www.maharesult.nic.in :  महाराष्ट्र बोर्ड 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. महाराष्ट्र राज्य मंडळ आणि उच्च माध्यमिक शिक्षण (MSBSHSE) मंडळाचा आज दुपारी १ वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार आहे.  या संदर्भातील माहिती काल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.  या संदर्भातील लाइव्ह अपडेट टाइम्स नाऊ मराठीच्या वेबसाइटवर देण्यात येणार आहेत. (MSBSHSE HSC Result 2022 announce shorty at mahresult nic in www.hscresult.mkcl.org, http://hsc.mahresults.org.in )

अधिक वाचा : MSBSHSE HSC Result 2022 LIVE: बारावीच्या निकालाच्या सर्व अपडेट्स 

बारावी बोर्ड सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्सचा निकाल एकत्र जाहीर करणार आहे.  विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतील.

यावेळी महाराष्ट्र बोर्डाने 4 मार्च ते 07 एप्रिल 2022 या कालावधीत 12वी बोर्डाची परीक्षा घेतली होती, ज्यामध्ये सुमारे 14.72 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेत भाग घेतला होता. पेपर संपल्यानंतर एक ते दोन आठवड्यांच्या दरम्यान पेपर तपासण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, मात्र मध्येच शिक्षक संपावर गेल्याने उत्तर पत्रिका तपासणीचे काम पुढे ढकलण्यात आले होते. त्यामुळे निकालाला विलंब होतो की काय असा अंदाज वर्तविण्यात येत होता. तसेच भविष्यातील अॅडमिशन लक्षात घेता १० जून पूर्वी निकाल लावणे बंधनकारक होते. तसा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता.  

 बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही विषयांमध्ये उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्सद्वारे त्यांचा निकाल तपासावा. 

महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल 2022, कसा तपासायचा

 1. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
 2. होमपेजवर, MSBSHSE 10वी निकाल 2022 या लिंकवर क्लिक करा, निकाल जाहीर होताच लिंक सक्रिय होईल.
 3. तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख एंटर करा, कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
 4. तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तुम्ही खाली डाउनलोड करून सेव्ह करून डेस्कटॉपवर सेव्ह करू शकता.

कसा पाहाल आपला निकाल? 

 1. रिझल्ट पाहण्यासाठी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा
 2. त्यानंतर Maharashtra HSC result 2022 क्लिक कर
 3. त्यानंतर एक विंडो सुरु होईल. 
 4. इथे आपला रोल नंबर आणि आईचं नाव टाकून सबमिट करा. 
 5. त्यानंतर काही क्षणात रिझल्ट आपल्या स्क्रीनवर येईल.


या वेबसाईटवर पाहू शकाल निकाल

 1. mahresult.nic.in
 2. maharashtraeducation.com
 3.  mahahsscboard.maharashtra.gov.in.
 4. या तीनही वेबसाईटवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी