SSC & HSC Result 2022 Date: दहावी, बारावी निकालाबाबत मोठी बातमी, निकालाची प्रोसेस पूर्ण या दिवशी लागणार निकाल 

MSBSHSE Board Result 2022 । दहावी, बारावीच्या निकाल लावण्यासंदर्भातील (10th, 12th result date 2022) कार्य अखेरच्या स्टेजला आहे. त्यामुळे बारावीचा निकाल येत्या ६ किंवा ७ जूनला जाहीर होण्याची शक्यता  राज्य मंडळातील सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. बारावीच्या निकाल जाहीर करण्यासंदर्भातील सर्व प्रोसेस  पूर्ण झाली आहे.  शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हिरवा कंदील दिल्यावर  निकाल जाहीर केला जाऊ शकतो. 

MSBSHSE Maharashtra Board  MSBSHSE maharashtra board exams result date 2022 ssc hsc result date update read in marathi
दहावी, बारावी निकालाबाबत मोठी बातमी 
थोडं पण कामाचं
  • दहावी, बारावीच्या निकालाचे काम अखेरच्या स्टेजवर
  • ६ किंवा ७ जूनला बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता
  • बारावीनंतर लगेचच दोन आठवड्यात दहावीचा निकाल

MSBSHSE Result । मुंबई :  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या निकालाची  (HSC SSC Result 2022) प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे बारावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात , तर दहावीचा निकाल तिसऱ्या आठवड्यात जाहीर होणार असल्याची माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी टाइम्स नाऊ मराठीशी बोलताना दिली. (MSBSHSE Maharashtra Board  MSBSHSE maharashtra board exams result date 2022 ssc hsc result date update read in marathi )

अधिक वाचा : स्पर्म दान करून माणूस बनला १५ मुलांचा बाप, वाचा सविस्तर

राज्यात नऊ विभागीय मंडळ आहे. त्यांनी परीक्षा संपल्यावर तात्काळ निकालाची प्रोसेस सुरू केली होती. सर्व मंडळांचे काम पूर्ण झाले असून आता निकाल जाहीर करण्याचे कार्य अखेरच्या स्टेज आहे. त्यामुळे ६ किंवा ७ जूनला बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी दिली. बारावीच्या निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ग्रीन सिग्नल दिल्यावर निकाल जाहीर केला जाणार आहे. 

त्याचसोबत दहावीच्या निकालाचे कामालाही अखेरचा हात फिरवला जात आहे.  बारावीनंतर लगेचच आठवडाभरात किंवा दोन आठवड्यानंतर  जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. दि. ४ ते ३० मार्चदरम्यान राज्यभरात ही परीक्षा घेण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातील दोन लाख एक हजार १९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती.

अधिक वाचा : नकली जामीन पेपर बनवणारी टोळीची पर्दाफाश

नऊ मंडळात नाशिकचे काम अगोदर पूर्ण 

मंडळाच्या नऊही विभागांपैकी नाशिक विभागाचे निकालाचे काम सर्वप्रथम पूर्ण झाले होते. मे महिन्याच्या सुरुवातीलाच नाशिक विभागाचे काम पूर्ण झाल्याची माहिती विभागीय मंडळामार्फत देण्यात आली. बारावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातील एक लाख ६३ हजार ६७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोरोनामुळे दोन वर्षे परीक्षाच न झाल्यामुळे सूत्र वापरून निकाल जाहीर करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना दोन वर्षे परीक्षेचा सराव नसल्यामुळे यंदा दहावी, तसेच बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्याची, तसेच आपापल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

११ वीसाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू 

दहावीच्या निकालानंतर अकरावीला प्रवेश घेणाची लगबग सुरू होते. हे लक्षात घेत शिक्षण संचालनालयाने अकरावीचे प्रवेश अर्ज भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली असून, नोंदणीसह अर्जाचा एक पार्ट भरण्यास सुरुवात झाली आहे. SSCचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा दुसरा पार्ट  दोन भरण्यास सुरुवात होणार असल्याचे शिक्षण संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आले होते. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होणार असल्यामुळे अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया याच आठवड्यात सुरू होणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यापासून अकरावीच्या प्रवेश फेऱ्यांचे नियोजन जाहीर केले जाऊ शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी