एमएसबीटीईचे निकाल जाहीर, बघण्यासाठी क्लिक करा

MSBTE Results 2020 Summer महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे यंदाच्या उन्हाळी डिप्लोमाचे निकाल जाहीर. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवीर मंडळाने नियमित विद्यार्थ्यांचे शेवटचे सत्र वगळून निकाल जाहीर केले.

MSBTE Results 2020 Summer
एमएसबीटीईचे निकाल जाहीर 

थोडं पण कामाचं

 • एमएसबीटीईचे निकाल जाहीर
 • उन्हाळी डिप्लोमाचे निकाल जाहीर
 • निकाल संस्थेच्या वेबसाइटवर बघण्यासाठी उपलब्ध

मुंबईः महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे यंदाच्या उन्हाळी डिप्लोमाचे निकाल (MSBTE Results 2020 Summer) जाहीर झाले आहेत. हे निकाल संस्थेच्या वेबसाइटवर बघण्यासाठी उपलब्ध आहेत. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचा सीट क्रमांक टाइप करणे आवश्यक आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवीर मंडळाने नियमित विद्यार्थ्यांचे शेवटचे सत्र वगळून उर्वरित सत्रांआधारे तयार केलेले निकाल जाहीर केले आहेत. 

निकाल बघण्याची लिंक - https://msbte.org.in/SOLCOVD2020RESBTELIVE/frmSUM20COVIDDisplay.aspx

निकाल बघण्याची सोपी पद्धत

 1. निकाल बघण्यासाठी https://msbte.org.in/ या वेबसाइटवर जा
 2. वेबसाइटवर निकाल बघण्यासाठी Click here to see Summer 2020 Diploma Results अशी लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक करा. 
 3. आता https://msbte.org.in/SOLCOVD2020RESBTELIVE/frmSUM20COVIDDisplay.aspx ही लिंक उघडेल. यात सीट नंबर (Seat No.) आणि नोंदणी क्रमांक (Enrollment No.) असे दोन पर्याय दिसतील. यातील एक पर्याय निवडा.
 4. सीट नंबर (Seat No.) हा पर्याय निवडल्यास बाजूच्या रकान्यात विद्यार्थ्याचा सीट नंबर बिनचूक टाकणे आवश्यक आहे आणि नोंदणी क्रमांक (Enrollment No.)  हा पर्याय निवडल्यास बाजूच्या रकान्यात विद्यार्थ्याचा नोंदणी क्रमांक अचूक टाकणे आवश्यक आहे. ही माहिती दिल्यानंतर खाली असलेल्या सबमिट (Submit) बटणावर क्लिक करा आणि संबंधित विद्यार्थ्याचा निकाल बघा
 5. लक्षात ठेवा कोरोना संकटामुळे नियमित विद्यार्थ्यांचे अंतिम सत्र वगळून उर्वरित सत्रांआधारे तयार केलेले निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या संदर्भातले अधिकृत पत्रक वेबसाइटच्या मुख्य पानावर म्हणजेच होमपेजवर महत्त्वाचे परिपत्रक (Latest Circulars) या विभागात आहे.
 6. AICTE (सहा सत्र - दुसऱ्या आणि चौथ्या सत्राचे निकाल), AICTE (आठ सत्र - दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या सत्राचे निकाल), AICTE/Non AICTE (२ वर्ष - पहिल्या वर्षाचा निकाल), AICTE/Non AICTE (३ वर्ष - पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचा निकाल), Non AICTE (३ सत्र - दुसऱ्या सत्राचा निकाल), Non AICTE (४ सत्र - दुसऱ्या सत्राचा निकाल)
 7. अंतिम सत्र/वर्ष वगळून नियमित विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर 
 8. गुणपत्रिका वितरणाबाबत लवकरच परिपत्रक काढणार
 9. संस्थांना त्यांच्या लॉगइन (Login) वर त्यांच्याकडच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांची सॉफ्टकॉपी मिळणार आहे. विद्यार्थी तसेच शिक्षण संस्थांना ऑनलाइन स्वरुपात निकालाची सॉफ्टकॉपी बघून तिची प्रिंट काढून घेता येईल.
 10. निकालाची अधिकृत प्रत अर्थात गुणपत्रिका देण्याबाबतचे परिपत्रक वेबसाइटवर लवकरच अपलोड केले जाईल. विद्यार्थ्यांनी या संदर्भातील माहितीसाठी MSBTE वेबसाइटला नियमित भेट देत लक्ष ठेवावे.
 11. निकालाविषयी कोणतीही तक्रार, हरकत, आक्षेप असल्यास MSBTE या प्रश्नांची दखल घेईल. 
 12. पुढील शैक्षणिक सत्र/वर्ष या संदर्भातले निर्णय, सूचना, परिपत्रक MSBTEच्या अधिकृत वेबसाइटवरच उपलब्ध होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेचे भान ठेवून या संदर्भातले निर्णय घेतले जाणार आहेत.
 13. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ संदर्भातल्या कोणत्याही वृत्ताची खात्री करुन घेण्यासाठी थेट MSBTE कडे संपर्क साधावा अथवा MSBTEच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी; अफवांवर विश्वास ठेवू नये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी