Electriciy Bill : मुंबई : गेल्या काही दिवसांत महागाईने पुन्हा डोकं वर काढले आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढत असताना घरगुती आणि कमर्शियल गॅसचेही भाव वाढले आहेत. असे असले तरी मुंबईकरांना महागाईतून थोडा दिलासा मिळणार आहे. ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांचे वीजबिल कमी होणार आहे. गुढीपाढव्याच्या दिवशी मुंबईतील दोन वीज कंपन्यांनी आपले वीज दर कमी केले आहे. त्यामुळे मुंबईतील वीज ग्राहकांना वीजबील कमी येणार आहे.
A reason for Mumbaikars to rejoice!
— TataPower (@TataPower) March 28, 2022
Residential consumers of Tata Power can expect up to a 4% drop in electricity bills from 1st April, as per the multi-year tariff plan of the Maharashtra Electricity Regulatory Commission.
Read more here: https://t.co/COtovDDbBS#ThisIsTataPower
मुंबईत वीजपुरवठा करणार्या टाटा आणि महावितरण या कंपन्यांनी वीजबील कमी केले आहे. टाटा कंपनीने आपल्या वीज दरात ४ टक्के तर महावितरणने आपल्या वीज दरात २ टक्क्यांनी घट केली आहे. हे दर आजपासून लागू झाले आहेत. जसजसा उन्हाळा जवळ येतो तसतशी ग्राहकांची विजेची मागणी वाढते. घरात पंखा, कूलर आणि एसीचा वापर वाढतो. उकाड्यापासून वाचण्याच्या नादात वीजबील जास्त येतं. परंतु टाटा आणि महावितरणने वीजदर कमी केल्याने सामान्य माणसांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एकीकडे महावितरण आपल्या वीजदरात २ टक्के तर टाटा ४ टक्के कपात करत आहेत. तर बेस्टचे दर स्थिर असणार आहेत. अदानी कंपनीची वीज महागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अदानी कंपनीच्या वीजबिलात प्रति युनिट १ ते ६ पैश्यांनी वाढ होणार आहे, त्यामुळे अदानी कंपनीच्या ग्राहकांना ऐन उन्हाळ्यात वाढीव वीजबिलाचा शॉक बसू शकतो.
१ प्रिल पासून २०२२-२३ हे नवे वित्तीय वर्ष सुरू झाले आहे. या दिवसापासून अनेक छोटे मोठे आर्थिक बदल दिसणर आहेत. काही ठिकाणी सामान्य माणसांना दरवाढीचा झटका बसणार आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेतल्याने सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत होणार आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.