Mahavitaran : आनंदाची बातमी, वीज कर्मचाऱ्यांचा संप मिटला

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 04, 2023 | 17:31 IST

Mahavitaran, Mahadiscom, MSEDCL, Maharashtra State Electricity Distribution Company Limited, MSEDCL unions call off strike, strike of electricity workers ended : आनंदाची बातमी. महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला आहे. महाराष्ट्राच्या सर्वाधिक भागात विजेचा पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी पुकारलेला संप मागे घेतल्याचे जाहीर केले. 

Mahavitaran
Mahavitaran : आनंदाची बातमी, वीज कर्मचाऱ्यांचा संप मिटला  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Mahavitaran : आनंदाची बातमी, वीज कर्मचाऱ्यांचा संप मिटला
  • विविध मागण्यांसाठी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला होता
  • कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला

Mahavitaran, Mahadiscom, MSEDCL, Maharashtra State Electricity Distribution Company Limited, MSEDCL unions call off strike, strike of electricity workers ended : आनंदाची बातमी. महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला आहे. महाराष्ट्राच्या सर्वाधिक भागात विजेचा पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी पुकारलेला संप मागे घेतल्याचे जाहीर केले. 

विविध मागण्यांसाठी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला होता. या संपाची सुरुवात बुधवार 4 जानेवारी 2023 रोजी झाली. पण संध्याकाळ पर्यंत राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा करुन संपावर तोडगा काढला. तोडगा निघाल्यामुळे कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतल्याचे जाहीर केले. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन संपावर तोडगा काढला. देवेंद्र फडणवीस, महावितरण कंपनीचे अधिकारी आणि महावितरणच्या कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी यांनी संप प्रकरणी चर्चा केली आणि तोडगा काढला. तोडगा निघाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी संप मिटल्याचे जाहीर केले.

''आमची वीज वितरण कंपन्यांच्या 32 संघटनांशी सकारात्मक चर्चा झाली. राज्य सरकारला कंपन्यांचं खासगीकरण करायचं नाही. पुढच्या तीन वर्षांमध्ये राज्य सरकार विजेशी संबंधित तिन्ही सरकारी कंपन्यांमध्ये मिळून 50 हजार रुपयांची गुंतवणूक करणार आहे. राज्य शासनाचा वीज कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा विचार नाही''; असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पॅरलल लायसन्स प्रकरणात एमआरसीकडे एक अर्ज दाखल झाला आहे. या प्रकरणी कर्मचाऱ्यांच्या मनात काही शंका होत्या पण त्यांना आश्वस्त केले आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Paush Purnima : कधी आहे नव्या वर्षातील पहिली पौर्णिमा? जाणून घ्या पौर्णिमेचे व्रत आणि उपाय

January 2023 : जानेवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस

कंत्राटी कामगारांसंदर्भात विधानसभेत घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांच्या वयात शिथिलता दिल्याशिवाय त्यांना घेता येणार नाही. पण त्यांचा समावेश करुन घेण्यासाठी नियम बनवण्यात येईल. कमी पगाराच्या विषयावरही व्यवस्था उभी करण्याचं ठरवलं आहे; अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. एक अॅग्रीकल्चर कंपनी तयार करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. या विषयी देखील संघटनांशी चर्चा झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ही कंपनी कृषी क्षेत्राला विजेचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी