खुशखबर: दिवाळी सुट्टीत एसटीच्या दररोज १ हजार जादा फेऱ्या

ST buses for Diwali festival: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने बसेसच्या ज्यादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. याचा फायदा राज्यातील प्रवाशांना होणार आहे. 

ST Buses
एसटी बसेस (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या जादा फेऱ्यांचे नियोजन 
  • दिवाळीच्या काळात दररोज १ हाजर विशेष जादा फेऱ्यांचे एसटीचे नियोजन 
  • प्रवाशांना आगाऊ आरक्षण करता येणार

मुंबई : दिवाळी सणासुदीच्या (Diwali Festival) काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत एसटी महामंडळाने (ST Mahamandal) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळी सणात होणारी गर्दी आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेत एसटी बसेसच्या ज्यादा फेऱ्यांचे नियोजन एसटी महामंडळा (Maharashtra State Road Transport Corporation)तर्फे करण्यात आले आहे. यानुसार ११ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या काळात एसटीच्या जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

एसटी महामंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या एसटी बसेसच्या ज्यादा फेऱ्यांसाठी प्रवाश्यांना आगाऊ आरक्षण करता येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाच्या https://msrtc.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरुन प्रवासी आपले आरक्षण करु शकतात. एसटी महामंडळातर्फे सोडण्यात येणाऱ्या ज्यादा बसेसच्या फेऱ्या या राज्यातील प्रमुख बसस्थानकातून सुटणार आहेत. तसेच टप्प्याटप्प्याने आगाऊ आरक्षण प्रवाशांना करता येणार आहे. 

एसटी महामंडळातर्फे दरवर्षी सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी ज्यादा बसेस किंवा ज्यादा बसेसच्या फेऱ्यांचे नियोजन करण्यात येते. त्यातच यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यासंबंधितत असलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी एसटी महामंडळाने ज्यादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. 

यंदा एसटी महामंडळातर्फे दिवाळीच्या काळात दररोज सुमारे एक हजार विशेष ज्यादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. तसेच या संदर्भातील सूचना संबंधित आगार प्रमुखांनाही दिल्या आहेत अशी माहिती राज्याची परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी