MSRTC : एसटी कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारची मोठी भेट, 2 महिन्यांचा पगार होणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Feb 19, 2023 | 14:16 IST

MSRTC employees will get two months salary : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी महामंडळाच्या 88 हजार कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र शासनाने दिलासा दिला आहे.

MSRTC employees will get two months salary
एसटी कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारची मोठी भेट  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • MSRTC : एसटी कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारची मोठी भेट
  • 2 महिन्यांचा पगार होणार
  • थकीत पगारासाठी 223 कोटी रुपयांची तरतूद

MSRTC employees will get two months salary : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी महामंडळाच्या 88 हजार कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र शासनाने दिलासा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत पगार देण्यासाठी शिंदे सरकारने एक जीआर (Government Resolution - GR / शासन निर्णय) काढला आहे. या जीआरमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एसटीच्या 88 हजार कर्मचाऱ्यांना डिसेंबर 2022 आणि जानेवारी 2023 चा पगार अर्धा फेब्रुवारी महिना उलटला तरी मिळाला नव्हता. पगाराअभावी एसटी कर्मचाऱ्यांचे हाल होत होते. नोकरीत असूनही घरखर्च चालवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना उधार घेणे अथवा बचतीमधले पैसे वळते करुन घेणे हे उपाय करावे लागत होते. कर्मचाऱ्यांना होत असलेल्या हा त्रास दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जीआर (Government Resolution - GR) काढला.

Petrol Pump Fraud : सावधान, पेट्रोल पंपावर सुरू आहे फसवणूक, नुकसान टाळण्यासाठी हा आहे उपाय

जीआर (Government Resolution - GR) काढून राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना थकीत पगार देण्यासाठी अर्थसहाय्य लेखाशिर्षाखाली 223 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरतुदीमुळे थकीत पगार देण्याचे काम सोपे होणार आहे, असे राज्य शासनाचे म्हणणे आहे. पगारासाठी दिलेले 223 कोटी रुपये परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या माध्यमातून पगारासाठी खर्च केले जातील. 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने थकीत पगार देण्यासाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती. राज्य शासनाने या मागणीची दखल घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 223 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

गृह विभागाचा शासन निर्णय : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर, 2022 च्या वेतनासाठी रु.223.00 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत....

Magha Amavasya : माघ अमावस्या म्हणजे काय?

महाराष्ट्राच्या गृह विभागाचा शासन निर्णय

एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत पगार देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्याच्या गृह विभागाने शासन निर्णय अर्थात जीआर काढला आहे. हा गुरुवार 16 फेब्रुवारी 2023 चा शासन निर्णय आहे. या निर्णयाद्वारे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी 223 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी