विलिनीकरणाचा निर्णय रखडला, एसटी कर्मचाऱ्यांना ४१ टक्के पगारवाढ

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 25, 2021 | 01:25 IST

MSRTC strike: Highest ever hike in ST employees salaries committee to decide on merger पगारवाढ आणि एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण या दोन मुख्य मागण्यांसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना समाधानकारक पगारवाढ देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

MSRTC strike: Highest ever hike in ST employees salaries committee to decide on merger
विलिनीकरणाचा निर्णय रखडला, एसटी कर्मचाऱ्यांना ४१ टक्के पगारवाढ 
थोडं पण कामाचं
  • विलिनीकरणाचा निर्णय रखडला, एसटी कर्मचाऱ्यांना ४१ टक्के पगारवाढ
  • एसटी कर्मचारी उद्या अंतर्गत बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार
  • संप मिटण्याची शक्यता

MSRTC strike: Highest ever hike in ST employees salaries committee to decide on merger मुंबईः पगारवाढ आणि एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण या दोन मुख्य मागण्यांसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत परिवहन मंत्र्यांनी अंतरिम पगारवाढ देणार असल्याचे सांगितले. बैठकीत पगारवाढीवर सकारात्मक चर्चा झाली. एसटी कर्मचाऱ्यांना समाधानकारक पगारवाढ देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी उद्या सकाळी ११ वाजता अंतर्गत बैठक घेऊन पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. विलिनीकरणाबाबतचा निर्णय न्यायालयाच्या आदेशाने स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशीआधारे घेऊ, असे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार मूळ वेतनाच्या ४१ टक्के वाढ दिली जाईल. दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत कर्मचाऱ्यांचे पगार होतील. 

अनिल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरभाडे भत्ता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. पगारवाढ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच केली जावी, ही बाब देखील मान्य झाली आहे. या बाबी करारामध्ये होत्या. पण बेसिकचा विषय होता. जे कर्मचारी सेवेत एक वर्ष ते दहा वर्ष या श्रेणीत आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट पाच हजार रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन १२ हजार ८० रुपये होतं त्याचं आता १७ हजार ३९५ झालं आहे. त्याचं पूर्ण वेतन १७ हजार ३९५ होतं ते आता २४ हजार ६९४ झालं आहे. म्हणजे ७ हजार २०० रुपयांची वाढ पहिल्या श्रेणीच्या कर्मचाऱ्यांसाठी केली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या पगारवाढीपैकी ही एक मोठी वाढ आहे. जवळपास ४१ टक्के ही पगारवाढ करण्यात आली असून एसटीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आणि ऐतिहासिक पगारवाढ आहे. 

दहा ते वीस वर्षांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात चार हजारांची वाढ केली आहे. त्यामुळे त्यांचा पूर्ण पगार २३ हजार ४० होता तो आता २८ हजार ८०० रुपये झाला आहे. वीस वर्षांहून अधिक श्रेणीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात दोन हजार पाचशे रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मूळ वेतन २६ हजार आणि स्थूल वेतन ३७ हजार ४४० होतं, त्यांचं वेतन आता ४१ हजार ४० झालं आहे. ज्याचं मूळ वेतन ३७ हजार होतं आणि स्थूल वेतन ५३ हजार २८० होतं, त्यांना २५०० रुपयांची वाढ केल्यामुळे मूळ वेतन ३९ हजार ५०० तर स्थूल वेतन ५६ हजार ८८० होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी