Mumbai Crime: मुंबई हादरली ! १३ वर्षीय मुलावर ६ अल्पवयीन मुलांकडून लैंगिक अत्याचार

Crime News: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १३ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • मुंबईतील धक्कादायक घटना
  • १३ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार
  • घृणास्पद कृत्य करणारे आरोपीही अल्पवयीन

Crime News Marathi: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबईतील एका १३ वर्षीय मुलावर ६ मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणातील सर्व सहा आरोपी हे सुद्धा अल्पवयीनच असल्याची माहिती समोर आली आहे. (mumbai 13 year old boy sexually assault by 6 boys crime news marathi)

एक - दोन नाही तर गेल्या अनेक महिन्यांपासून आरोपी या मुलाचं लैंगिक शोषण करत होते. इतकेच नाही तर आरोपींनी या कृत्याचा एक व्हिडिओ सुद्धा बनवला होता. याच व्हिडिओच्या आधारे आरोपी या मुलाला ब्लॅकमेल करत होते आणि त्याचं लैंगिक शोषण करत होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.

अधिक वाचा : घरातून निघालेली तरुणी परतलीच नाही, नंतर जे घडलं ते....

मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोपी मार्च महिन्यापासून पीडित मुलाचं लैंगिक शोषण करत होते. मार्च महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत हे कृत्य आरोपींकडून सुरू होते. सुरुवातीला ज्यावेळी आरोपींनी पीडित तरुणासोबत गैरकृत्य केलं त्याचवेळी त्यांनी त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं होतं. त्यानंतर याच व्हिडिओच्या माध्यमातून आरोपी त्या मुलाला ब्लॅकमेल करुन वारंवार त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. इतकेच नाही तर त्याला मारहाण करुन धमकावत सुद्धा होते.

अधिक वाचा : Viral Video : नागपूर पोलीस हवालदाराने हॉटेलच्या गार्डला मारली कानाखाली, नो पार्किंगवरून वाद, व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक म्हणजे पीडित मुलगा आणि आरोपी हे सर्वजण एकाच परिसरात राहतात. एकाच चाळीत हे सर्व राहतात आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात. आरोपींकडे पीडित मुलावर अत्याचार केल्याचे अनेक अश्लील व्हिडिओ होते आणि त्याच व्हिडिओच्या माध्यमातून आरोपी त्याला ब्लॅकमेल करत होते. त्यापैकी एक व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाला होता. हाच व्हिडिओ पीडित मुलाच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचला.

पीडित मुलाच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती होताच त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले. सर्व आरोपी हे अल्पवयीन आहेत त्यांच्या विरोधात ३७७, ५०६, आयटी अ‍ॅक्ट सेक्शन ६७, ६७ बी याच्यासह इतरही कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी