BMC announced water cut in some area of Mumbai: मुंबईतील पूर्व उपनगरात मुलुंड जकात नाक्याजवळ जलवाहिनीतू पाणी गळती होत आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबई मनपाकडून तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 27 मार्च 2023 रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते 29 मार्च 2023 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत पाणी कपात करण्यात येणार आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) तर्फे पर्जन्य जलवाहिनीसाठी बॉक्स कल्वर्हटचे काम सुरू असताना मुलुंड जकात नाका परिसरात हरिओम नगर येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 2345 मिलिमीटर व्यासाच्या मुंबई-2 जलवाहिनीस हानी पोहोचून पाणी गळती होत असल्याचे 27 मार्च 2023 रोजी निदर्शनास आले.
हे पण वाचा : कलिंगडच्या बिया वाढवतात शुक्राणूंची संख्या, तुम्ही ट्राय केलं का?
पिसे-पांजरापूर संकुलातून पाणी वाहून आणणाऱ्या या जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. हे दुरुस्तीचे काम सोमवार 27 मार्च 2023 रोजी रात्री 10 वाजल्यापासून बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत होणार आहे. या काळात पूर्व उपनगर आणि शहरातील विविध परिसरात 15 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.
हे पण वाचा : हे उपाय करा अन् डास चावल्यावर येणारी खाज पळवा
हे पण वाचा : 6 सेकंदात Google शोधून दाखवा, 95 टक्के होतात फेल
पाणी कपात होत असल्याने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, या काळात पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे असंही मुंबई मनपाकडून सांगण्यात आले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.