Mumbai : 26/11 प्रमाणे हल्ल्याच्या धमक्या; बंद झालेल्या मोबाईल क्रमांकांवरुन आल्या धमक्या, पोलिसांची उडली झोप

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 25, 2022 | 07:34 IST

मुंबई (Mumbai) शहरात 26/11 सारखा हल्ला करणार असल्याचा मेसेज (message) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मिळाला. या मेसेजनंतर एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ट्रॅफिक कंट्रोल रूमला (traffic control room) धमकीचा (threat) मेसेज (message) करण्यात आलेला मोबाईल नंबरचा तपास केला जात आहे.

Threats of attack came from closed mobile numbers
बंद झालेल्या मोबाईल क्रमांकांवरुन आल्या हल्ल्याच्या धमक्या   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वसईत मिळालेला नंबरचा तपास केल्यानंतर युजर हा हेअर कटिंग करतो.
  • चौकशीसाठी क्राईम ब्रँचचे एक पथक हरियाणाला रवाना.
  • व्हॉट्सअ‍ॅप नंबरचा आयपी अ‍ॅड्रेस आतापर्यंत काढता आलेला नाही.

मुंबई  : मुंबई (Mumbai) शहरात 26/11 सारखा हल्ला करणार असल्याचा मेसेज (message) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मिळाला. या मेसेजनंतर एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ट्रॅफिक कंट्रोल रूमला (traffic control room) धमकीचा (threat) मेसेज (message) करण्यात आलेला मोबाईल नंबरचा तपास केला जात आहे. धमक्या आलेल्या मोबाईल क्रमाकांनी पोलिसांची भांबेरी उडवली आहे. मुंबई पोलीस ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर (Whatsapp) 10 मोबाइल क्रमांक पाठवले होते, त्यापैकी चार मोबाइल क्रमांकांनी गुप्तचर यंत्रणांची झोप उडवली. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले, हे चार क्रमांक यावर्षी फेब्रुवारीपासून बंद आहेत.

यूपीतील 4 नंबर, एक नंबर वसईचा

गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक (ATS) च्या मदतीने यूपीतील बिजनौरचे 5 पैकी 4 नंबर तसेच एक नंबर वसईमधला निघाला आहे. वसईत ज्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली तो हेअर कटिंग करतो, त्याची चार दिवस चौकशी करण्यात आली. बाकी लोकांची उत्तर प्रदेशात चौकशी करण्यात आली. दरम्यान, आता क्राईम ब्रँचचे एक पथक हरियाणाला चौकशीसाठी गेले आहे, जेणेकरून ज्याचा नंबर व्हॉट्सअ‍ॅपवर आला त्या व्यक्तीची चौकशी करण्यात येईल.

Read Also : गणेश चतुर्थीची कथा ऐकल्याने पूर्ण होतील तुमची सर्व कामे!

मोबाईल क्रमांक कोणाचा ट्रेस लागेना 

चार मोबाइल क्रमांकांपैकी फेब्रुवारीमध्ये एक, जुलैमध्ये दोन आणि ऑगस्टमध्ये एक मोबाईल क्रमांक बंद करण्यात आले आहेत. यामुळे तपास यंत्रणेची चिंता वाढली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही त्या मोबाइल नंबरचा सीडीआर काढला आहे. जेणेकरून त्या मोबाईल नंबरच्या युजरचा शोध घेता येईल आणि त्यांची चौकशी केली जाईल. परंतु सूत्रांनी सांगितले की, क्राइम ब्रँचला त्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरचा आयपी अ‍ॅड्रेस आतापर्यंत काढता आलेला नाही, फक्त इतकी माहिती मिळालीय की, हा आयपी अ‍ॅड्रेस यूकेच्या इंटरनेट प्रोव्हायडर कंपनीचा आहे.

Read Also : शुभमन गिल-सारा तेंडुलकरमध्ये ब्रेकअप ?

सूत्रांनी असेही सांगितले की गुन्हे शाखेला संशय आहे की, व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करणाऱ्याने व्हीपीएन (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) वापरला असावा जेणेकरून त्याचे लोकेशन ट्रेस होऊ शकत नाही. तपास अद्याप प्राथमिक अवस्थेत असल्याने या प्रकरणातील टेरर अ‍ॅंगलही नाकारलेला नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी