Mumbai News: खेळता-खेळता इमारतीच्या ११व्या मजल्यावरुन ५ वर्षीय चिमुकला खाली कोसळला, मुंबईतील ह्रदयद्रावक घटना

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 11, 2022 | 15:53 IST

Mumbai child fall to death from 11th floor of building: इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन एक पाच वर्षीय चिमुकला खाली पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत ही दु:खद घटना घडली आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन चिमुकला खाली पडला
  • खेळता-खेळता खिडकीतून चिमुकला पडला खाली
  • पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू 

मुंबई : घरात लहान मुले असतील तर त्यांची काळजी घेणं आणि त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देणं फारच महत्त्वाचे असते. जराही आपलं दुर्लक्ष झालं तर एखादी दुर्घटना होऊ शकते. असाच काहीसा प्रकार मुंबईतील भायखळा परिसरात घडला आहे. एक मुलगा खेळता खेळता इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन खाली कोसळला. या घटनेच पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मुंबईतील भायखळा परिसरातील एका हायप्रोफाईल परिसरातील सोसायटीत ही घटना घडली आहे. इमारतीच्या ११व्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबातील पाच वर्षीय मुलगा बेडरूममध्ये खेळत होता. खेळता खेळता हा मुलगा खिडकीतून थेट खाली कोसळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा खिडकी जवळ छत्रीसोबत खेळत होता आणि त्याचवेळी ही दुर्घटना घडली आहे. खेळता-खेळता तो थेट इमारतीवरुन खाली कोसळला. 

आग्रीपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भायखळा परिसरात असलेल्या पवित्र मार्ग येथील जनता सहकारी सोसायटीत ही घटना घडली आहे. हा मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत इमारतीत राहत होता. इमारतीच्या ११व्या मजल्यावरील आपल्या अपार्टमेंटमधील बेडरूममधील खिडकीजवळ तो एकटाच खेळत होता.

हे पण वाचा : आईची हत्या करुन २२ वर्षीय मुलाची धावत्या Local Train समोर उडी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आला समोर 

खिडकीतून खाली कोसळला

आग्रीपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा या मुलाची आई आपल्या नातेवाईकांसोबत गप्पा मारत होती. त्याच वेळी हा मुलगा बेडरूममधील खिडकीतून खाली वाकून पाहत होता. तितक्यात त्याचा तोल गेला आणि तो खिडकीतून खाली कोसळला. बेडरूममधील या खिडकीला कुठल्याही प्रकारची सेफ्टी ग्रील नाहीये आणि त्यामुळेच हा चिमुकला खाली पडला. खिडकीतून पडलेला मुलगा खाली उभ्या असलेल्या स्कूटवर पडला आणि त्यानंतर रस्त्यावर कोसळला.

त्यानंतर या चिमुकल्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर डॉक्टरांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी संपूर्ण इमारतीची पाहणी केली, तसेच इमारतीमधील रहिवाशांकडेही विचारपूस केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी