बुलेट ट्रेनला महाराष्ट्र शासनाचा ग्रीन सिग्नल

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 14, 2022 | 17:24 IST

Mumbai-Ahmedabad bullet train project gets all clearances from Maharashtra government : मुंबई : ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम थंडावले होते. पण शिंदे सरकार येताच बुलेट ट्रेनच्या कामाला गती येऊ लागली आहे.

Mumbai-Ahmedabad bullet train project gets all clearances from Maharashtra government
बुलेट ट्रेनला महाराष्ट्र शासनाचा ग्रीन सिग्नल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बुलेट ट्रेनला महाराष्ट्र शासनाचा ग्रीन सिग्नल
  • रखडलेली आणि स्थगित झालेली कामं वेगाने पूर्ण करण्यासाठी मंजुरी
  • बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पुढील कामांसाठी नियमानुसार मंजुरी दिली जाईल

Mumbai-Ahmedabad bullet train project gets all clearances from Maharashtra government : मुंबई : ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम थंडावले होते. पण शिंदे सरकार येताच बुलेट ट्रेनच्या कामाला गती येऊ लागली आहे. सरकारी धोरणामुळे रखडलेल्या अथवा स्थगित असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या महाराष्ट्रातील सर्व कामांसाठी आवश्यक ती मंजुरी देण्याची प्रक्रिया नियमानुसार वेगाने सुरू झाली आहे. हा एकप्रकारे बुलेट ट्रेनला महाराष्ट्र शासनाचा ग्रीन सिग्नल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या चर्चेवर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीमुळे आता शिक्कामोर्तब झाले.

बळीराजासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचं अनुदान

बुलेट ट्रेन प्रकल्पाशी संबंधित आधीपासून सुरू असलेली आणि मध्यंतरीच्या काळात रखडलेली आणि स्थगित झालेली कामं वेगाने पूर्ण करण्यासाठी मंजुरी दिली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पुढील कामांसाठी नियमानुसार मंजुरी दिली जाईल, अशी स्पष्ट माहिती फडणवीस यांनी दिली.

Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार होणार या तारखेला; किती आमदारांचा होणार शपथविधी?

मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रालयात पत्रकार परिषद झाली. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या शेजारीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले होते. या पत्रकार परिषदेत बुलेट ट्रेन संदर्भात प्रश्न येताच उपमुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाच्या रखडलेल्या आणि स्थगित असलेल्या कामांना पुन्हा सुरुवात झाली आहे. उर्वरित निर्णय लवकरच नियमानुसार होतील, असे सांगितले. कायदेशीर प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडवले जातील पण पायाभूत विकासाची कामं थांबू दिली जाणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

बुलेट ट्रेन प्रकल्प हा ५०८ किमी.चा प्रकल्प आहे. या हायस्पीड कॉरिडॉर योजनेसाठी १.१ ट्रिलियन डॉलरच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. बुलेट ट्रेन साबरमती जंक्शन, अहमदाबाद, आणंद/नडियाद, वडोदरा (बडोदा), भरूच, सुरत, बिलिमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे, मुंबई बीकेसी या स्टेशनांवर थांबणार आहे. जेमतेम दोन तासांत या गाडीने प्रवास पूर्ण होणार आहे. 

महाराष्ट्रात भूसंपादनाशी संबंधित काही प्रकरणे न्यायालयात आहेत. या प्रकरणांमध्ये कायद्याच्या चौकटीत राहून लवकर निर्णय घेतले जातील, असा विश्वास राज्य शासनाने व्यक्त केला. बुलेट ट्रेनच्य तिकिटाची किंमत किती असेल हे अद्याप जाहीर झालेले नाही. पण तिकिटाची किंमत रेल्वेच्या फर्स्ट एसीच्या तिकिटाच्या दराच्या आसपास असेल अशा स्वरुपाचे सूतोवाच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. यामुळे तिकिटाची किंमत अडीच हजारांच्या घरात असेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

जपानच्या शिंकासेनच्या तंत्रज्ञांच्या माध्यमातून भारतात बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे. हा प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित करण्यावर तंत्रज्ञांचा भर आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाची रचना ताशी ३५० किमी वेगाने ट्रेन पळविण्यासाठी सुरू आहे. पण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला गाडी ताशी ३२० किमी वेगाने पळणार आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन (NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED - NHSRCL) बुलेट ट्रेन प्रकल्पावर काम करत आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने अलिकडेच एल अँड टी कंपनीशी आठ किमी मोठ्या वायडक्टची संरचना करणे आणि तो तयार करणे यासाठीचा करार केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी