Auto Rickshaw and Taxi Fare Hike : मुंबईत आजपासून रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार; जाणून नवे दर

Mumbai Auto Rickshaw and Taxi Fare Hike: मुंबईत आजपासून रिक्षा टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. रिक्षा टॅक्सी प्रवास भाड्यात वाढ झाली असून या प्रवास भाड्याची आजपासून अंमलबजावणी होणार आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसणार आहे. काळ्या पिवळ्या टॅक्सीतून प्रवास करण्यासाठी 28 रुपये तर रिक्षातून प्रवास करण्यासाठी किमान 23 रुपये भाडे द्यावे लागणार आहे.

auto and taxi fare increased
टॅक्सी रिक्षाच्या भाडेवाढ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईत आजपासून रिक्षा टॅक्सीचा प्रवास महागणार आहे.
  • रिक्षा टॅक्सी प्रवास भाड्यात वाढ झाली असून या प्रवास भाड्याची आजपासून अंमलबजावणी होणार आहे,
  • त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसणार आहे.

Mumbai Auto Rickshaw and Taxi Fare Will Hike: मुंबई : मुंबईत आजपासून रिक्षा टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. रिक्षा टॅक्सी प्रवास भाड्यात वाढ झाली असून या प्रवास भाड्याची आजपासून अंमलबजावणी होणार आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसणार आहे. काळ्या पिवळ्या टॅक्सीतून प्रवास करण्यासाठी 28 रुपये तर रिक्षातून प्रवास करण्यासाठी किमान 23 रुपये भाडे द्यावे लागणार आहे.  गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्षा आणि टॅक्सी भाडे करण्याची मागणी संघटनांकडून होत होती. सरकारने रिक्षा टॅक्सी संघटनाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने संघटनांनी संपाची धमकी दिली होती. त्यानंतर सरकारने संघटनाची बैठक घेऊन भाडेवाढ करण्यास मान्यता दिली. (mumbai auto rickshaw and taxi fare hike from today know new rates)

अधिक वाचा :  Kalyan Crime News: मुलाला ONGC मध्ये नोकरीला लावतो सांगितलं, कल्याणच्या डॉक्टरला 12 लाखांचा गंडा


आजपासून भाडेवाढ लागू

रिक्षा टॅक्सीच्या नव्या भाड्यानुसार काळी पिवळी टॅक्सीसाठी आता किमान भाडे 25 रुपयांऐवजी 28 मोजावे लागणार आहेत. तर पूर्वी रिक्षासाठी किमान भाडे 21 रुपये होते आता किमान भाड्यासाठी प्रवाशांना 23 रुपये मोजावे लागणार आहेत. दीड किलोमीटरच्या अधिक प्रवासासाठी प्रवाशांना काळी पिवळी टॅक्सीमध्ये आता 18.66 रुपये मोजावे लागणार होते. पूर्वी हे भाडे 16.93 रुपये इतके होते. 

अधिक वाचा :  Mumbai Crime News: अंधेरीत हॉटेलच्या रूममध्ये मॉडेलनं संपवलं आयुष्य, सुसाईट नोटमध्ये केला मोठा खुलासा

ऑटोरिक्षात एक किमी प्रवासाठी पूर्वी 14.20 रुपये भाडे आकारले जायचे. आता या भाड्यात वाढ होऊन 15.33 रुपये द्यावे लागणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात 60 हजार टॅक्सी आणि चार लाख 60 हजार रिक्षा धावतात. या रिक्षा आणि टॅक्सीत 2021 प्रमाणे दर आकारले जायचे. 

सीएनजी आणि पेट्रोल महाग

गेल्या काही दिवसांत सीएनजी आणि पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याने रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी ही दरवाढ करण्याची मागणी केली होती. 2021 साली जेव्हा रिक्षा आणि टॅक्सीचे प्रवास भाडे निर्धारित केले होते तेव्हा प्रतिकिलो सीएनजीची किंमत 49 रुपये इतकी होती. आता सीएनजीची किंमत प्रतिकिलो 80 रुपये इतकी झाली आहे. इतकेच नाही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतही वाढ झाली आहे. देशात महागई वाढली आहे प्रत्येक वस्तू आणि सेवा महागल्याने ही दरवाढीची मागणी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी केली होती. 

अधिक वाचा : आता केवळ नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र आणि महाराष्ट्रात सरकार येईल- बावनकुळे

एसी टॅक्सीही महाग

फक्त सर्वसामान्य टॅक्सीच नव्हे तर एसी टॅक्सीच्या किमान भाड्यातही वाढ झाली आहे. एसी टॅक्सीसाठी पूर्वी किमान भाडे 30 रुपये इतके होते त्यात 10 रुपयांनी वाढ होऊन किमान भाडे 40 रुपये इतके करण्यात आले आहे. तसेच प्रतिकिमी एसी टॅक्सीचे भाडे आता 26.71 रुपये इतके करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी