Mumbai Bank : मुंबई : भाजप नेते (BJP leader) व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) बोगस मजूरप्रकरणी (Bogus labor) चौकशीसाठी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर (Mata Ramabai Ambedkar) पोलीस ठाण्यात (Police Station) हजर झाले आहेत. मुंबई बँकेत (Mumbai Bank) मजूर असल्याची नोंद करून संचालक मंडळावर गेल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. यावेळी पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यासमोर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
दरम्यान दरेकरांना अटक होऊ शकत नाही, कारण बोगस मजूरप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केल्यास अटकपूर्व जामिनासाठी प्रवीण दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या जामिनावर 29 मार्च रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे दरेकरांच्या वकिलांनी पुढील सुनावणीपर्यंत दिलासा देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत पुढील सुनावणीपर्यंत प्रवीण दरेकरांना याप्रकरणात अटक करू नये, असे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आज प्रवीण दरेकर यांची केवळ चौकशी होणार आहे.
स्वत:ला मजूर दाखवत मुंबै बँकेच्या संचालकपदी बेकायदा निवडून येत कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांच्यावर आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार आपण स्वत: पोलिसांसमोर हजर राहून त्यांना आवश्यक ती सर्व माहिती देणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे. दरम्यान, मुंबई बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांना बोगस मजूर म्हणून अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर आम आदम पक्षातर्फे धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात दिली होती.
मुंबै बँकेच्या संचालकपदी मजूर प्रवर्गातून बेकायदा निवडून आल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांच्यावर आहे. याप्रकरणी सहकार विभागनेही प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले आहे. यावर आज पत्रकार परिषद घेत प्रवीण दरेकर यांनी स्पष्टीकरण दिले. मी पुर्वी मजूरच होतो. मीदेखील अंगमेहनतीची कामे केली आणि नंतर मी श्रीमंत झालो, असे दरेकर यांनी सांगितले. या देशात धीरूभाई अंबानी यांनीदेखील सुरूवातीला पेट्रोल पंपावर काम केले होते. नंतर ते स्वत:च्या हुशारीने श्रीमंत झाले. श्रीमंत होणे हा काय गुन्हा आहे का, असा सवाल दरेकर यांनी केला आहे. हे प्रकरण अत्यंत छोटे आहे. मी मजूर असल्याबाबत माझ्याकडे तलाठ्याचे कागदपत्रेही आहेत. मात्र, सरकारकडून पराचा कावळा केला जात आहे, असे दरेकर म्हणाले.
Read Also : मनसे कार्यकर्त्यांनी लावली हनुमान चालीसा
माझ्यावर एफआयर दाखल करण्याची पोलिसांना खूप घाई झाली होती. त्यांच्यावर राज्य सरकारचा दबाव होता. मुख्यमंत्र्यांचा देखील कारावाईचा अट्टाहास होता. राज्य सरकारच्या दबावाखाली एफआयआर दाखल झाला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे. त्यांना पूर्ण माहिती देणार असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
Read Also : हातात आणि पायात काळे धागे बांधणे वाईट की चांगलं, वाचा
कार्यकर्त्यांनी कुठेही गडबड करू नये, असे आवाहनही दरेकर यांनी केले आहे. राज्यातील अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यावर बलात्कारासारखे गंभीर गुन्हे आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. मात्र, विरोधकांविरोधात सरकारकडून सुडभावनेने कारवाई केली जात आहे. या सर्वांविरोधात आम्ही न्याय मागणार आहोत. आमच्यावर 100 गुन्हे दाखल केले तरी सरकारविरोधात आवाज उठवण्याचे आम्ही थांबवणार नाही, असेही दरेकर म्हणाले.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर मजूर या प्रवर्गातून संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. प्रवीण दरेकर नेमकी कुठे मजुरी करतात, असा सवाल करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकरांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर सहकार विभागानेही प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले होते. त्यामुळे दरेकर यांना संचालकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, प्रवीण दरेकर तब्बल 20 वर्षे संचालकपदावर होते. म्हणून त्यांनी सरकारची तब्बल 20 वर्षे फसवणूक केली, असा आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.