मुंबै बँकेत सत्तांतर होणार, प्रविण दरेकर पुन्हा अध्यक्ष होणार?

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 04, 2022 | 20:03 IST

Mumbai Bank : महाविकास आघाडी सरकारला राज्यातली सत्ता गमावल्यापासून सतत धक्के बसत आहेत. आता या धक्क्यांमध्ये आणखी एका धक्क्याची भर पडण्याची शक्यता आहे.

Mumbai Bank
मुंबै बँकेत सत्तांतर होणार, प्रविण दरेकर पुन्हा अध्यक्ष होणार?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबै बँकेत सत्तांतर होणार, प्रविण दरेकर पुन्हा अध्यक्ष होणार?
  • मुंबै सहकारी बँकेत शुक्रवार ५ ऑगस्ट २०२२ रोजी सत्तांतर होण्याची चिन्हं
  • नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड शुक्रवार ५ ऑगस्ट २०२२ रोजी होणार

Mumbai Bank : महाविकास आघाडी सरकारला राज्यातली सत्ता गमावल्यापासून सतत धक्के बसत आहेत. आता या धक्क्यांमध्ये आणखी एका धक्क्याची भर पडण्याची शक्यता आहे. मुंबै सहकारी बँकेत शुक्रवार ५ ऑगस्ट २०२२ रोजी सत्तांतर होण्याची चिन्हं आहेत. प्रविण दरेकर पुन्हा एकदा मुंबै बँकेचे अध्यक्ष होतील अशी चर्चा आहे. । मुंबै बँक

मुंबै बँकेच्या संचालक मंडळाची उद्या म्हणजेच शुक्रवार ५ ऑगस्ट २०२२ रोजी बैठक आहे. याच बैठकीत बँकेच्या नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. 

बँकेचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी आणि उपाध्यक्ष विठ्ठल भोसले यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे सहा महिन्यांच्या आतच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद रिक्त झाले आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या शुक्रवार ५ ऑगस्ट २०२२ रोजी होणाऱ्या बैठकीत नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने प्रविण दरेकर पुन्हा एकदा बँकेच्या अध्यक्षपदी निवडले जाण्याची शक्यता आहे.

मजूर म्हणून अपात्र ठरलेले भाजप आमदार आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पुन्हा अध्यक्षपदी विराजमान होणार की दरेकरांकडून प्रसाद लाड यांचे नाव पुढे केले जाणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. 

मुंबै बँकेत २१ संचालक आहेत. दरेकर हे मजूर म्हणून अपात्र ठरल्यानंतर संचालकांची संख्या २० झाली आहे. यामुळे ११ मते मिळवणारी व्यक्ती अध्यक्ष होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मिळून दहा संचालक आहेत. ताज्या परिस्थितीत बिनविरोध निवड करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी