Mumbai Bank Election : मुंबै बँकेत महाविकास आघाडीचा अध्यक्ष, भाजपचा उपाध्यक्ष

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 13, 2022 | 20:10 IST

Mumbai Bank Election 2022 NCP candidate elected as chiarman and BJP candidate elected as vice chiarman : मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अनपेक्षित असा निकाल आला.

Mumbai Bank Election 2022 NCP candidate elected as chiarman and BJP candidate elected as vice chiarman
मुंबै बँकेत महाविकास आघाडीचा अध्यक्ष, भाजपचा उपाध्यक्ष 
थोडं पण कामाचं
  • मुंबै बँकेत महाविकास आघाडीचा अध्यक्ष, भाजपचा उपाध्यक्ष
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेले सिद्धार्थ कांबळे बँकेचे अध्यक्ष झाले
  • उपाध्यक्षपदी भाजपचे विठ्ठल भोसले विजयी झाले

Mumbai Bank Election 2022 NCP candidate elected as chiarman and BJP candidate elected as vice chiarman : मुंबई : मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अनपेक्षित असा निकाल आला. महाविकास आघाडीचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेले सिद्धार्थ कांबळे बँकेचे अध्यक्ष झाले तर ईश्वर चिठ्ठी टाकून उपाध्यक्ष निवडण्यात आला. उपाध्यक्षपदी भाजपचे विठ्ठल भोसले विजयी झाले. 

दरेकर-लाड यांच्या नेतृत्वात निवडून आलेल्या सर्वपक्षीय सहकार पॅनलच्या संचालकांमधून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यासाठी निवड व्हायची होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन स्वतःचा अकरा संचालकांचा महाविकास आघाडी हा गट स्वतंत्र गट केला. भाजपचे नऊ संचालक होते. यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेले सिद्धार्थ कांबळे यांचा आरामात विजय झाला. भाजपच्या प्रसाद लाड यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली. यामुळे ईश्वर चिठ्ठी काढून विजयी उमेदवाराचे नाव जाहीर करायचे असा निर्णय झाला. या प्रक्रियेत विजय झाल्यामुळे भाजपचे विठ्ठल भोसले उपाध्यक्ष झाले. उपाध्यक्षपदी निवडून येण्याचे शिवसेनेच्या अभिषेक घोसाळकर यांचे स्वप्न अपूर्ण राहिले.

याआधी प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करुन अध्यक्षपद मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. पण ही चर्चा निष्फळ ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबै बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी-शिवसेना युतीची घोषणा केली. यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत बँकेतील महाविकास आघाडी समर्थक संचालकांची एक बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीच्या डावपेचांवर चर्चा झाली. त्यानंतर झालेल्या मतदानात अध्यक्षपद मिळवण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली पण उपाध्यक्षपद मिळवणे त्यांना जमले नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी