Mumbai News : नालेसफाई केली म्हणून मुंबईत बारमालकासह चौघांना अटक, वाचा सविस्तर

साफ सफाई करणे आणि स्वच्छता ठेवणे ही चांगली गोष्ट आहे. लहानपणापसून आपल्याला स्वच्छता ठेवणे शिकवले जाते. परंतु साफ सफाई करणे एका बारमालकाला आणि त्याच्या कर्मचार्‍यांना महागात पडले आहे. नालेसफाई केली म्हणून मुंबईतल्या एका बारमालकाला आणि त्याच्या तीन कर्मचार्‍यांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

arrest
अटक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • साफ सफाई करणे आणि स्वच्छता ठेवणे ही चांगली गोष्ट आहे.
  • लहानपणापसून आपल्याला स्वच्छता ठेवणे शिकवले जाते.
  • परंतु साफ सफाई करणे एका बारमालकाला आणि त्याच्या कर्मचार्‍यांना महागात पडले आहे.

Bar Owner Arrested : मुंबई : साफ सफाई करणे आणि स्वच्छता ठेवणे ही चांगली गोष्ट आहे. लहानपणापसून आपल्याला स्वच्छता ठेवणे शिकवले जाते. परंतु साफ सफाई करणे एका बारमालकाला आणि त्याच्या कर्मचार्‍यांना महागात पडले आहे. नालेसफाई केली म्हणून मुंबईतल्या एका बारमालकाला आणि त्याच्या तीन कर्मचार्‍यांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. (mumbai bar owner and four other arrested for manual scavenging)

अधिक वाचा : Mumbai: आईची हत्या करुन २२ वर्षीय मुलाची धावत्या Local Train समोर उडी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आला समोर

मिळालेल्या माहितीनुसार ग्रांट रोड भागातील पुखराज बारचे मालकने आपल्या भागातील एक नाल्याचे झाकण काढले आणि आपल्या बारच्या तीन कर्मचार्‍यांना हा नाला साफ करण्यास सांगितले. तेव्हा सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी ही माहिती मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांना दिली. साफ सफाई करणे ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु नालेसफाई हे काम मुंबई महानगर पालिकेचे आहे. तसेच जेव्हा कर्मचार्‍यांनी ही नालेसफाई हाती घेतली तेव्हा त्यांनी आपला जीव धोक्यात घातला. मुंबईत अनेक ठिकाणी ही नालेसफाई मशीनींच्या साहाय्याने केली जाते.

अधिक वाचा : कडक सॅल्यूट ! रजेवर असलेल्या जवानाने जीवाची पर्वा न करता वाचवले प्रवाशांचे प्राण

मार्च महिन्यात कांदिवली भागात नालेसफाई करताना तीन सफाई कामगारांचा मृत्यू झाला होता. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास या तीन कर्मचार्‍यांनी नालीचे झाकण उघडले आणि नालेसफाई करताना त्यांचा मृत्यू झाला होता. फक्त मुंबईच नव्हे तर देशभरात अनेक ठिकाणी नालेसफाई करताना अशा प्रकारे सफाई कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे.

अधिक वाचा : पोलिसांची मोठी कारवाई, डांबून ठेवलेल्या ५० जनावरांची सुटका, कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरे डांबून ठेवल्याचा संशय

मुंबईतील नालेसफाईचे काम मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित येतं. त्यासाठी इतरांनी हे काम करणे चुकीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी ही घटना मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर विधवा, मजूरांसाठी लढणार्‍या आभा सिंह यांच्या तक्रारीवरून बारमालकासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली आहे.

पत्नीला धोका देणार्‍या इंजिनीअरला अटक

विवाहित असताना आपल्या गर्लफ्रेंड सोबत फॉरेन ट्रिप करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. एका तरुणाचे एका तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध होते. इतकेच नाही तर आपल्या गर्लफ्रेंडसोबत तो मालदिवला गेला होता. परंतु मालदिवला गेल्याचा उल्लेख त्याच्या पासपोर्टवर होता. म्हणून मालदिवला येताना त्याने आपल्या पासपोर्टची काही पाने फाडली. जेव्हा एअरपोर्टवर अधिकार्‍यांच्या निदर्शनास  फाटलेला पासपोर्ट आढळला तेव्हा त्याला अटक करण्यात आली. कारण अशा प्रकारे पासपोर्टची पानं फाडणे हा गुन्हा आहे. पासपोर्टची पाने का फाटली याचे उत्तर देण्यास तो असमर्थ ठरला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी