BEST Corona : बेस्टच्या ६६ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण, ४४ रुग्णालयात दाखल

BEST Corona बेस्टच्या ६६ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

corona virus
कोरोना 
थोडं पण कामाचं
  • बेस्टच्या ६६ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण
  • ४४ रुग्णालयात दाखल
  • ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

BEST Corona : मुंबई : बेस्टच्या  (Best) ६६ कर्मचार्‍यांना कोरोनाची (corona) लागण झाली आहे. त्यापैकी ४४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

बेस्टचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल कुमार यांनी माहिती दिली की सर्व कर्मचार्‍यांना कोरोनाची हलकी लक्षणे आहेत, कुठल्याही रुग्णाला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले. या कर्मचार्‍यांना खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे डॉ. कुमार यांनी सांगितले. 

मुंबईत मंगळवारी १० हजार ६०६ रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या ८ लाख १६ हजार ९६५ वर पोहोचली आहे. राज्यात काल १८ हजार ४६६ रुग्ण आढळले आहेत. तर ७५ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. सध्या महाराष्ट्रात ६५३ ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत. दिल्लीत ४६४ रुग्ण असून देशात एकूण ओमिक्रॉन रुग्णांची संख्या २ हजार १३५ वर पोहोचली आहे. 

 राज्यात आणि देशात कोरोनाचे संकट पुन्हा वाढत आहे. दिवसेंविस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचे संकट असतना नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने राज्याची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ओमिक्रॉनचे ७५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असून सार्वजनिक ठिकाणी लस न घेतल्याला नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे.
ज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यातील १३ मंत्री आणि ७० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. 

तर लॉकडाऊन लावावा लागेल
 

राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढले असून मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर दिवसाला २० हजार रुग्ण आढळले तर मुंबईत लॉकडाऊन लावाला लागेल अशी माहिती महापौर किशोरी पेडेणेकर यांनी दिली आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी