Mumbai Electricity tariff hike: मुंबईकरांसाठी मोठी बातमी, बेस्टची वीज 18 टक्क्यांनी महागण्याची शक्यता

BEST propose electricity hike: मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक लागण्याची चिन्ह आहेत. कारण, मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट प्रशासनाकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 

Mumbai BEST propose to tariff hike 18 per cent from april read in marathi
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईकरांना वीज दरवाढीचा झटका
  • बेस्ट प्रशासनाकडून 18 टक्क्यांनी वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव

BEST proposed hike of 18 per cent tariff in mumbai: मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट प्रशासनाकडून वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. बेस्ट प्रशासनाकडून मुंबईत 18 टक्क्यांनी वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगासमोर ठेवण्यात आला आहे. याचा सर्वात मोठा फटका हा झोपडपट्टी, चाळीत राहणाऱ्या नागरिकांना सर्वाधिक बसणार आहे. (Mumbai BEST propose to tariff hike 18 per cent from april read in marathi)

गेल्या आठवड्यात अदानी इलेक्ट्रिसिटीकडून 2 ते 7 टक्के वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. तर टाटा पावरकडून 10 ते 30 टक्के वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगासमोर ठेवण्यात आला आहे. अदानी आणि टाटा पावर नंतर आता बेस्ट प्रशासनाने वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

हे पण वाचा : मुलांच्या मनातील भीती कशी काढायची?

तज्ज्ञांच्या मते, हाय एंड म्हणजेच जास्त वीज वापरत असलेले ग्राहक आपल्याकडे आकर्षित करण्याचा बेस्ट प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे 301 ते 500 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांच्या दरात दोन टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तर 100 युनिट वापरणाऱ्या ग्राहकांच्या वीज दरवाढीत 18 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव आहे.

हे पण वाचा : आचार्य चाणक्य यांच्या मते, या लोकांपासून वाईट काळ पळतो दूर

तर दुसरीकडे दुकाने, कार्यालये आणि इतर व्यावसायिक आस्थापना यांच्यासाठी वीज दरात कपात करण्याचा प्रस्ताव बेस्टने सादर केला आहे. या ग्राहकांच्या वीज दरात 6 टक्क्यांनी कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हाऊसिंग सोसायट्यांमधील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसाठी बेस्ट प्रशासनाकडून 16 टक्क्यांनी वीज शुल्कात कपात करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी