मुंबई: BMC On Mumbai Road Potholes: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत (Mumbai) पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र पंधरवड्यात पावसानं अक्षरश: धुमाकूळ घातला. या मुसळधार पावसानं (Heavy Rain) मुंबईतल्या रस्त्यांची चाळण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे मुंबई पालिकेला (Roads in Mumbai) नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावं लागतंय. मात्र पावसाळ्यात आतापर्यंत 18 हजार खड्डे (Potholes) बुजवल्याचा दावा मुंबई पालिकेनं (BMC) केला आहे.
मुंबई महापालिकेनं रस्त्यांवरील खड्ड्यांकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे सध्या पालिका कोल्डमिक्सच्या साहाय्यानं खड्डे बुजवण्याचं काम वेगानं करत आहे. दुसरीकडे 18 हजार खड्डे बुजवण्यात आल्याचं मुंबई पालिकेनं सांगितलं आहे. मात्र तरीही खड्ड्यांची समस्या पूर्णपणे संपलेली नाही. या खड्ड्यांमुळे मुंबईकरांना खड्डे आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या ट्रॅफिक जामच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे.
खड्डे बुजवण्याचं काम वेगानं सुरू
सध्या खड्डे बुजवण्याच्या कामांची गती मुंबई पालिकेकडून वाढवण्यात आली आहे. 25 जुलैपर्यंत जवळपास 18 हजार खड्डे बुजवण्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. त्यात कोल्डमिक्सचा वापर करून 15 हजार 588 खड्डे बुजवण्यात आल्याचं पालिकेनं सांगितलं आहे. त्यात 1 हजार 154 कंत्राटदारांमार्फत आणि पालिकेच्या केंद्रीय संस्थेमार्फत 1 हजार 266 इतके खड्डे बुजवण्यात आले आहेत. मुंबई पालिका खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर करत आहे. तर इतर ठिकाणचे खड्डे बुजवण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं पालिकेकडून सांगण्यात येत आहे.
सर्वाधिक रस्ते मालाड भागात
सर्वात जास्त म्हणजे 1 हजार 294 खड्डे मालाड (पी-उत्तर) येथे बुजवण्यात आले. गोरेगाव (पी-दक्षिण) मध्ये 1,088 खड्डे, अंधेरीत 1,199 बुजविण्यात आले.
मुंबईतल्या खड्ड्यांची विभागवार आकडेवारी
मालाड- 1294
गोरेगाव- 1088
अंधेरी- 1199
गोवंडी - 860
भांडुप- 780
चेंबूर- 584
बोरिवली - 406
मुंबईतल्या खड्ड्यांची समस्या वाईट
मुंबईतल्या खड्ड्यांची समस्या मिटताना दिसत नाही. रस्त्यांवर एवढा निधी खर्च होत असताना पुन्हा पुन्हा खड्डे का पडताना दिसत आहेत, असा सवाल मुंबई पालिकेतील भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते देण्यात पालिका अपयशी ठरत आहे असं म्हणत त्यांनी चांगले रस्ते देण्यामागे तंत्रज्ञान, निर्णय, धोरण अशा नेमक्या गोष्टीत कमतरता आहे, हे पाहिले पाहिजे. तसंच पालिकेची वरवर मलमपट्टी न करता मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते द्यावेत, अशी मागणी प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.