mumbai : मुंबईतील आठ जम्बो कोविड सेंटर बंद होणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 29, 2022 | 11:13 IST

jumbo covid centres : कोरोना संकट सुरू झाल्यावर मुंबई मनपाच्या हद्दीत सुरू केलेली आठ जम्बो कोविड सेंटर बंद होणार आहेत. ही सेंटर बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

mumbai bmc decides to close 8 jumbo covid centres after decline in corona cases
mumbai : मुंबईतील आठ जम्बो कोविड सेंटर बंद होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • mumbai : मुंबईतील आठ जम्बो कोविड सेंटर बंद होणार
  • कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, संकट नियंत्रणात
  • कांजुरमार्ग, गोरेगावमधील नेस्को परिसर, दहिसरचे सेंटर बंद; बीकेसी, एनएससीआय वरळी, रिचर्डसन क्रुड्स भायखळा, मुलुंड, मालाडचे सेंटर बंद होणार

mumbai bmc decides to close 8 jumbo covid centres after decline in corona cases : कोरोना संकट सुरू झाल्यावर मुंबई मनपाच्या हद्दीत सुरू केलेली आठ जम्बो कोविड सेंटर बंद होणार आहेत. ही सेंटर बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे आणि संकट नियंत्रणात आहे. यामुळेच आठ जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पहिल्या टप्प्यात कांजुरमार्ग, गोरेगावमधील नेस्को परिसर, दहिसर येथील जम्बो कोविड सेंटर आधीच बंद करण्यात आली आहेत. आता बीकेसी, एनएससीआय वरळी, रिचर्डसन क्रुड्स भायखळा, मुलुंड आणि मालाड ही जम्बो कोविड सेंटर बंद केली जातील. 

जम्बो कोविड सेंटर बंद केली तरी अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमधील १८५० बेडचे कोविड सेंटर सुरू राहणार आहे. हे सेंटर बंद करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. कस्तुरबा हॉस्पिटल येथील ३०० बेडचे कोविड सेंटर पण सुरू राहणार आहे. मुंबई मनपाच्या हद्दीतील चार मोठी हॉस्पिटल तसेच इतर १६ हॉस्पिटल या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड आहेत. ही व्यवस्था पुढील निर्णयापर्यंत सुरू राहणार आहे. 

मुंबई आणि आसपासच्या भागांतून येणाऱ्या कोरोना रुग्णांवर उपचार करणे सोपे व्हावे यासाठी निवडक हॉस्पिटलमधील कोविड सेंटर सुरू ठेवली जातील. पण जम्बो कोविड सेंटर बंद केली जातील, अशी माहिती मुंबई मनपाने दिली आहे. 

प्रत्येक जम्बो कोविड सेंटर चालविण्याचा एका महिन्याचा खर्च एक ते दोन कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. मुंबईतले कोरोना संकट नियंत्रणात आहे त्यामुळे जम्बो कोविड सेंटर बंद करून त्यावर होणाऱ्या खर्चाचे पैसे मनपाच्या इतर कामांसाठी अथवा आरोग्य विभागाच्या योजनांसाठी देण्याचा निर्णय झाला आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार राज्यात गुरुवार २८ जुलै २०२२ रोजी २२०३ रुग्ण आणि ३ मृत्यू यांची नोंद झाली तर २४७८ जण बरे झाले. राज्यात १३६६५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ८० लाख ४१ हजार ५२२ कोरोना रुग्णांपैकी ७८ लाख ७९ हजार ७६६ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४८ हजार ०९१ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी ३० लाख ५६ हजार ९१९ कोरोना चाचण्यांपैकी ८० लाख ४१ हजार ५२२ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८४ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.६८ टक्के, रिकव्हरी रेट ९७.९९ टक्के आहे. मुंबईत १८०६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोरोना संकटामुळे मुंबईत मार्च २०२० मध्ये हॉस्पिटलमध्य खाटा अपुऱ्या पडत होत्या. या समस्येवर मात करण्यासाठी जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आली. आता या सेंटरची आवश्यकता नसल्यामुळे ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे; अशी माहिती मुंबई मनपाने दिली. 

मुंबईत जम्बो कोविड सेंटर बांधण्याचे काम महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीए यांनी संयुक्तपणे केले. मागील दोन वर्षांत जम्बो कोविड सेंटरचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. अनेक रुग्णांनी जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार घेतले. पण आता जम्बो कोविड सेंटरची आवश्यकता नसल्यामुळे ही सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे मुंबई मनपाने सांगितले. बंद केलेल्या कोविड सेंटरमधील औषधे, वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन यांचे मुंबई मनपाच्या इतर हॉस्पिटलमध्ये वितरण केले जाईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी